'शुद्धीकरण' वादाला नवं वळण; राहुल गांधींवर अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा

Rahul Gandhi Atrocity Case In Uttarakhand After Purification Row: शुद्धीकरणावरून सुरु झालेल्या वादाची.... उत्तराखंडमध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंनी घेतलेल्या सभेनंतर सभास्थळाचं भाजप कार्यकर्त्यांकडून शुद्धीकरण करण्यात आलं....मात्र याचं शुद्धीकरणानंतर आता राहुल गांधींवर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल झालाय... नेमकं प्रकरण काय आहे? शुद्धीकरणाच्या वादाला नवं वळण कसं मिळालयं ? पाहूयात या रिपोर्टमधून...
Uttarakhand Purification Row
Uttarakhand Purification Rowsaam tv
Published On

उत्तराखंडच्या हल्द्वानीतील काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या सभेनंतर करण्यात आलेल्या 'शुद्धीकरण' वादानं आता नवं वळण घेतलंय. विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी 'शुद्धीकरण' प्रकरणी कायदेशीर कारवाईची मागणी केली होती. मात्र, आता या शुद्धीकरणाच्या वादावरून उत्तराखंड पोलिसांनी राहुल गांधींवरच अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केलाय. पोलिसांनी राहुल गांधींवरच हे प्रकरण कसं उलटवण्यात आलंय ते पाहूयात.

8 ऑगस्टला उत्तराखंडच्या हल्द्वानीमध्ये काँग्रेसच्या रॅलीनंतर मल्लिकार्जुन खरगेंची सभा

खरगेंच्या संबोधनानंतर सभास्थळी हिंदुत्ववादी संघटनांकडून शुद्धीकरण यज्ञ

शुद्धीकरण यज्ञावरून आक्रमक होत काँग्रेसकडून भाजप-RSSवर आरोप

राहुल गांधींकडून भाजप-RSSवर अॅट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी

राहुल गांधींच्या मागणीमुळे भावना दुखावल्याची अनुसूचित जातीच्या तरुणाची पोलिसांत तक्रार

अनुसूचित जातीच्या भावना भडकावल्याचा ठपका ठेवत राहूल गांधींवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा

या शुद्धीकरणात सहभागी असलेल्या अमित कुमार यांनीच राहुल गांधींवर हे प्रकरण उलटवलंय. एकीकडे, भाजपच्या केंद्रातल्या नेत्यांनी या घटनेचा संसदेच्या अधिवेशनात निषेध केला होता. मात्र उत्तराखंडातल्या भाजप प्रदेशाध्यक्षांनी या शुद्धिकरणाचं समर्थन केल्यामुळे हे प्रकरण पुन्हा पेटलं. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार असलेल्या महेंद्र भट यांच्यावर अॅट्रोसिटी दाखल करण्याची मागणी केली. मात्र राहुल गांधीवरच गुन्हा दाखल झाला.

भट यांच्यावर गुन्हा दाखल कऱण्यासाठी राहुल गांधींनी आक्रमक भूमिका घेतलीय. सध्या राहुल गांधींनी सरकारला अडचणीत आणण्याची एकही संधी सोडलेली नाही.

पंतप्रधानांच्या निवासस्थासमोरील आंदोलन असो की पॅलेट गनच्या वापराविरोधात गुन्हा नोंदवण्यासाठी दिल्लीतल्या पोलीस स्टेशनसमोर सात तास मांडलेला ठिय्या. राहुल गांधी निष्कर्षापर्यंत पोहचल्याशिवाय माघार घेत नाहीत. त्यामुळे आता या प्रकरणातही ते उत्तराखंडात धडक देऊन गुन्हा दाखल करण्यासाठी पुन्हा एकदा ठिय्या आंदोलन करणार का?..याकडे देशाचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com