बेड उघडला तर नोटा आणि भिंत तोडली तर सोन्याचा खजिना! माजी ARTO अधिकाऱ्यांच्या घरात कुबेराचा खजिना

Raid On Assistant Regional Transport Officer Residence: उत्तर प्रदेश दक्षता विभागाने बेहिशोबी मालमत्तेच्या एका प्रकरणात मोठी धाड टाकत एका माजी एआरटीओ अधिकाऱ्याकडील मोठा खजिना सर्वांसमोर आणला. अधिकाऱ्याच्या निवासस्थानातून १.६२ कोटी रुपये रोख, १३ ​​किलो सोने, चांदी, मालमत्तेची कागदपत्रे जप्त केली आहेत.
Raid On Assistant Regional Transport Officer Residence
Raid On Assistant Regional Transport Officer Residencesaam tv
Published On
Summary
  • तब्बल १३ किलो सोने आणि १.६२ कोटींची रोकड जप्त करण्यात आली.

  • आग्रा येथे माजी एआरटीओ ललित कुमार यांच्या घरावर छापेमारी केली.

  • या प्रकरणाचा पुढील तपास आणि कायदेशीर कार्यवाही सुरू आहे.

बेड उघडला तर नोटा आणि भिंत तोडली तर सोन्याचा पाऊस, एखाद्या सिनेमातील कथानकातील छापेमारीत घडावं असा प्रकार आग्र्यातील एका माजी अधिकाऱ्याच्या घरात घडला. उत्तर प्रदेश दक्षता विभागाने बेहिशोबी मालमत्तेच्या एका प्रकरणात मोठी कारवाई केलीय आहे. तपास अधिकाऱ्यांना एआरटीओच्या संपत्तीबाबत संशय आला, त्यानंतर त्यांनी माजी अधिकाऱ्याच्या घरात छापेमारी केली. त्यानंतर घरातील कुबेराचा खजिना पाहून तपास अधिकाऱ्यांचे डोके च्रकावले.

Raid On Assistant Regional Transport Officer Residence
IAS Transferred: राज्यातील १२ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या,कोणाची कुठे झाली बदली?

बुधवारी अधिकाऱ्यांनी आग्राचे तत्कालीन एआरटीओ (ARTO) ललित कुमार यांच्या लखनौमधील निवासस्थानी छापा टाकला. या झडतीदरम्यान सुमारे १.६२ कोटी रुपयांची रोकड, १३ किलो सोने, ९ किलो चांदी, तसेच हिरे आणि दागिने सापडले. तसेच लखनौ, बाराबंकी, रायबरेली आणि नोएडा येथील अनेक घरे, भूखंड (प्लॉट्स), फ्लॅटची बुकिंग आणि शेतजमिनीशी संबंधित कागदपत्रेही तपासादरम्यान आढळून आली आहेत. इतकी मोठी संपत्ती पाहून अधिकाऱ्यांना डोके चक्रावले.

यासह दोन गाड्या, एक रिव्हॉल्व्हर आणि गुंतवणुकीशी संबंधित १ कोटी रुपयांहून अधिक किमतीची कागदपत्रे जप्त करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या सोने, चांदी आणि दागिन्यांचे अंदाजित मूल्य सुमारे २० कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास आणि कायदेशीर कार्यवाही सुरू आहे.

Raid On Assistant Regional Transport Officer Residence
IAS Officers Suspended: ठेकेदारांच्या पैशातून यूरोप-ऑस्ट्रेलियाचा दौरा; दोन IAS अधिकारी सस्पेंड, प्रशासकीय विभागात खळबळ

जप्त करण्यात आलेले सोने, चांदी आणि दागिने यांचे अंदाजित मूल्य २० कोटी रुपये इतके निश्चित करण्यात आले आहे. दक्षता विभागाच्या माहितीनुसार २०२४ मध्ये ललित कुमार यांच्याविरुद्ध 'भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्या'न्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सरकारी निर्देशानुसार या प्रकरणाचा तपास सुरू आहे. ७ आणि ८ जुलै रोजी लखनौमधील अलीगंज येथील ललित कुमार यांच्या निवासस्थानी छापे टाकण्यात आले आहे.

झडतीदरम्यान, दक्षता पथकाला मालमत्तेशी संबंधित मोठ्या संख्येने कागदपत्रे सापडली आहेत. यात लखनौ, नोएडा, बाराबंकी आणि रायबरेली येथील निवासी भूखंड, फ्लॅट्स, शेतजमीन आणि इतर स्थावर मालमत्तेचा समावेश आहे. दोन आलिशान गाड्यांव्यतिरिक्त, बँका, पोस्ट ऑफिस, म्युच्युअल फंड आणि मुदत ठेवींमधील (फिक्स्ड डिपॉझिट्स) १ कोटी रुपयांहून अधिकच्या गुंतवणुकीशी संबंधित कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com