IAS Transferred: राज्यातील १२ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या,कोणाची कुठे झाली बदली?

IAS Transferred: देवेंद्र फडणवीस सरकारकडून प्रशासनात मोठा फेरबदल करण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडल्यावर हा निर्णय जाहीर करण्यात आला.
IAS Transferred:
MAHARASHTRA IAS TRANSFERS: 12 SENIOR IAS OFFICERS TRANSFERRED, FADNAVIS GOVERNMENT ISSUES NEW ORDERSsaam tv
Published On
Summary
  • महाराष्ट्र सरकारने १२ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले.

  • मंगळवारी रात्री ८ वाजता अधिकृत आदेश काढण्यात आले.

  • मंत्रिमंडळ बैठकीनंतर हा महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यात आला.

महाराष्ट्र सरकारनं राज्यातील १२ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी सायंकाळी रात्री ८ वाजता सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले. आयएएस अधिकारी विजय सिंघल, अश्विनी जोशी, दीपेंद्रसिंग कुशवाह, वेलारसू या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा यात समावेश आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे सूत्रे हातात घेतल्यापासून अधिकाऱ्यांच्या बदल्याचा धडका लावला आहे. मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्याचा आदेश काढण्यात आला.

IAS Transferred:
IAS अधिकारी तुकाराम मुंढेंची २१ वर्षाच्या नोकरीत २५वी बदली; प्रामाणिक मुंढेंची वारंवार का होतेय बदली?

कोणत्या अधिकारीची कुठे झाली बदली?

अश्विनी जोशी -

यांची नियुक्ती आता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (MMRDA) अतिरिक्त महानगर आयुक्त पदावर करण्यात आली आहे. आधी ते मुंबई महानगरपालिकेत अतिरिक्त महानगर आयुक्त म्हणून कार्यरत होते.

श्रीमती प्राजक्ता वर्मा (IAS)

अश्विनी जोशी यांच्या जागी श्रीमती प्राजक्ता वर्मा (IAS) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्या आता मुंबई महानगरपालिकेत अतिरिक्त महानगर आयुक्तपदाचा कारभार संभाळतील.

IAS Transferred:
IAS Officers Suspended: ठेकेदारांच्या पैशातून यूरोप-ऑस्ट्रेलियाचा दौरा; दोन IAS अधिकारी सस्पेंड, प्रशासकीय विभागात खळबळ

विजय सिंघल

सिडकोचे एमडी विजय सिंघल यांची तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली आहे.

वेलारसू

यांचीही एमआयडीसीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे.

दिपेंद्र सिंग

एमआयडीसीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

डॉ. कादंबरी बलकवडे (२०१० बॅच):

यांची उद्योग संचालनालयाच्या विकास आयुक्त (उद्योग) पदी बदली करण्यात आली आहे. आधी त्या राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) मुंबईच्या संचालक आणि आयुक्त (कुटुंब कल्याण) होत्या.

संजय काटकर (२०१४ बॅच):

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) मुंबईचे संचालक आणि आयुक्त (कुटुंब कल्याण) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आधी ते महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाचे (MahaIT) व्यवस्थापकीय संचालक होते.

जेनिथ चंद्रा दोंथुला (२०२२ बॅच):

यांची गोंदिया जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. याआधी ते किनवट (नांदेड) येथे साहाय्यक जिल्हाधिकारी होते.

अनय नवंदर (२०२२ बॅच):

यांची अकोला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदी बदली झाली आहे. आधी ते तळोदा (नंदुरबार) येथे साहाय्यक जिल्हाधिकारी होते.

डॉ. बी. सरवणन (२०२३ बॅच):

किनवट (नांदेड) येथे प्रकल्प अधिकारी (ITDP) आणि साहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आधी ते भोकरदन (जालना) येथे साहाय्यक जिल्हाधिकारी होते.

श्रीमती लाघिमा तिवारी (२०२३ बॅच):

यांची तळोदा (नंदुरबार) येथे प्रकल्प अधिकारी (ITDP) आणि साहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. आधी ते गोंडपिंपरी (चंद्रपूर) येथे साहाय्यक जिल्हाधिकारी होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com