IAS Officers Suspended: ठेकेदारांच्या पैशातून यूरोप-ऑस्ट्रेलियाचा दौरा; दोन IAS अधिकारी सस्पेंड, प्रशासकीय विभागात खळबळ

Two Senior IAS Officers Suspended: बिहार सरकारने टेंडर माफिया ऋषूच्या अटकेनंतर दोन आयएएस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. निलंबित अधिकाऱ्यांनी ठेकेदारांच्या पैशातून परदेशाची सफारी केल्याचा आरोप करण्यात येत आहे.
Two Senior IAS Officers Suspended
Bihar government has suspended two senior IAS officers following the arrest of alleged tender mafia kingpin Rishu.saam tv
Published On
Summary
  • बिहार सरकारने दोन वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांना निलंबित केले.

  • टेंडर माफिया ऋषू श्री याच्याशी संबंध असल्याचे गंभीर आरोप.

  • ठेकेदारांकडून आर्थिक लाभ घेतल्याचा संशय व्यक्त.

प्रशासनात खळबळ उडवून बातमी समोर आली आहे,राज्यातील टेंडर माफिया ऋषूच्या अटकेनंतर सरकारी बाबूंवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. दोन आयएएस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. ऋषू श्री याच्याशी संगनमत केल्याच्या आणि त्यांच्याकडून बेकायदेशीर आर्थिक लाभ घेतल्याच्या गंभीर आरोपांखाली सरकारने दोन वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांना तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहे.

Two Senior IAS Officers Suspended
Shocking: पैशांच्या हव्यासापोटी आईनेच केली पोटच्या दोन मुलांची विक्री, तिघांना अटक; प्रियकर फरार

मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार, बिहार सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने आयएएस योगेश कुमार सागर (२०१७ बॅच) आणि आयएएस अभिलाषा कुमारी शर्मा (२०१४ बॅच) यांच्या निलंबनाबाबत अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. या दोन्ही अधिकाऱ्यांवर ऋषू श्रीला सरकारी विभागांकडून मोठा कंत्राट मिळवून देण्यास मदत केल्याचा आणि त्या बदल्यात स्वतःसाठी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी ऋषू श्रीकडून मोठी लाच आणि महागड्या भेटवस्तू घेतल्याचा आरोप करण्यात येत आहे.

Two Senior IAS Officers Suspended
IAS अधिकारी तुकाराम मुंढेंची २१ वर्षाच्या नोकरीत २५वी बदली; प्रामाणिक मुंढेंची वारंवार का होतेय बदली?

छाप्यादरम्यान अधिकाऱ्यांकडे सापडला कुबेराचा खजिना

विशेष दक्षता पथकाने (एसव्हीयू) कुख्यात कंत्राटदार आणि टेंडर माफिया रिशू श्री याला पाटणा येथून अटक केली आहे. अटकेपूर्वी, एसव्हीयूने रिशू श्रीच्या पाटणा येथील आलिशान फ्लॅटवर छापा टाकला, ज्यामुळे तपास अधिकारीही चकित झालेत. छाप्यादरम्यान अनेक वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.

या संपूर्ण रॅकेटची मुळे खूप खोलवर रुजलेली असून अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (PMLA) ऋषू श्री यांच्या विरोधात आधीच गुन्हा दाखल करण्यात आला होता. ईडीच्या तपासात हे धक्कादायक सत्य समोर आले की, सरकारी निविदा कंत्राट मिळवून देण्याच्या बदल्यात ऋषू श्री यांनी आयएएस लॉबीचा वापर अनेक स्तरापर्यंत केला होता.

आयएएस अधिकाऱ्यांच्या कुटुंबांची परदेशवारी

निविदा कंत्राट मिळवून दिल्याच्या बदल्यात, ऋषूश्रीने या आयएएस अधिकाऱ्यांसाठी आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबासाठी युरोप आणि ऑस्ट्रेलियासारख्या देशांमध्ये महागड्या विमान प्रवासाची व्यवस्था केली. प्रवासाची तिकिटे, पंचतारांकित हॉटेल्समधील निवास आणि स्थळदर्शन यांसह सर्व खर्च ऋषूश्रींनी स्वतः उचलला होता.

टेरेस गार्डनसाठी ९ लाखांचा खर्च

तपासात आणखी एक धक्कादायक बाब उघड झाली आहे, २०१४ च्या बॅचच्या आयएएस अधिकारी अभिलाषा कुमारी शर्मा यांच्या घराच्या छतावरील आलिशान गार्डनसाठी ९ लाख रुपयांच्या खर्च करण्यात आला होता तोही टेंडर माफिया ऋषू श्री यांनी दिला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com