Shocking: पैशांच्या हव्यासापोटी आईनेच केली पोटच्या दोन मुलांची विक्री, तिघांना अटक; प्रियकर फरार

Chandrapur Horror: चंद्रपूरमध्ये बाल तस्करीचे एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. एका महिलेने पैशांसाठी आपल्या दोन मुलांना विकले आणि एका नवजात बाळालाही विकण्याचा कट रचला होता. पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे.
Chandrapur Horror:
Chandrapur mother arrested for selling her own childrenSaam tv
Published On
Summary
  • चंद्रपुरात आईने स्वतःच्या दोन मुलांची पैशांसाठी विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार आला समोर

  • रामनगर पोलिसांनी कारवाई करत आंतरराज्य बाल तस्करी रॅकेटचा पर्दाफाश.

  • मुख्य आरोपी अजय फुलझेले फरार.

पैशांच्या हव्यासापोटी स्वतःच्या दोन निष्पाप मुलांची प्रत्येकी दोन लाखांत विक्री करणाऱ्या एका निर्दयी मातेचा थरारक कारनामा चंद्रपुरात उघडकीस आला आहे. स्वतःच्या मुलांची विक्री केल्यानंतर या महिलेने आपल्या १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीच्या नवजात बाळाचीही विक्री करण्याचा घाट घातला होता. रामनगर पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा डाव उधळला गेला. यानंतर आंतरराज्य बाल तस्करीच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे.

Chandrapur Horror:
Crime News: ४० कोटींचा जमीन व्यवहार; वादानंतर महिला वकिलाची आत्महत्या, ज्येष्ठ वकील आणि मुलाविरोधात गुन्हा दाखल

याप्रकरणी पोलिसांनी आरोपी आईसह, बाळ खरेदी करणाऱ्या चंद्रपूर आणि तेलंगणातील दोन महिलांना अटक केली आहे. तर या प्रकरणातील मुख्य सूत्रधार व नराधम प्रियकर अजय फुलझेले हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. आरोपींवर 'मानवी तस्करी' आणि 'पॉक्सो' अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पतीच्या निधनानंतर आरोपी महिला अजय फुलझेलेसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. दरम्यान अजयने तिच्या १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला, ज्यातून ती गरोदर राहिली.

Chandrapur Horror:
Kalyan : साखरपुडा मोडून मुलीनं बॉयफ्रेंडसोबत लग्न केलं, वडील संतापले, नवविवाहीत माहेरी येताच नको ते करून बसले

या घटनेची वाच्यता होऊ नये म्हणून आई आणि प्रियकराने मुलीला प्रसूतीसाठी नागपूरच्या मेडिकल रुग्णालयात दाखल केले व तिचे वय २० वर्षे असल्याचे खोटे सांगितले. मात्र, डॉक्टरांना संशय आल्याने त्यांनी पोलिसांना माहिती दिली. रामनगर पोलीसांनी तपास चक्र फिरवत मुलीच्या आईला ताब्यात घेतले.

चौकशीत तिने यापूर्वी स्वतःची दोन मुले दोन-दोन लाखांत विकल्याची आणि आता मुलीच्या नवजात बाळाचाही सौदा करणार असल्याची धक्कादायक कबुली दिली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत बाळ खरेदी करणाऱ्या महिलांनाही अटक केली असून पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com