Kalyan : साखरपुडा मोडून मुलीनं बॉयफ्रेंडसोबत लग्न केलं, वडील संतापले, नवविवाहीत माहेरी येताच नको ते करून बसले

Kalyan Crime News : कल्याणमध्ये प्रेमविवाह केल्याच्या रागातून वडिलांनी स्वतःच्या विवाहित मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपी विनोद वसईकर याला बाजारपेठ पोलिसांनी अटक केली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
KALYAN HONOUR KILLING CASE: FATHER ARRESTED FOR MURDERING DAUGHTER OVER LOVE MARRIAGE
KALYAN HONOUR KILLING CASE: FATHER ARRESTED FOR MURDERING DAUGHTER OVER LOVE MARRIAGESaam tv
Published On
Summary
  • कल्याणमध्ये वडिलांनी स्वतःच्या विवाहित मुलीची हत्या केली

  • मुलीने कुटुंबाच्या विरोधात जाऊन प्रेमविवाह केल्यामुळे वडील नाराज

  • घरातील वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपीने धारदार शस्त्राने हल्ला केला

  • घटनेनंतर फरार झालेल्या आरोपीला बाजारपेठ पोलिसांनी अटक केली

संघर्ष गांगुर्डे, कल्याण

Kalyan Murder Crime News कल्याण शहरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध जाऊन प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून स्वतःच्या विवाहित मुलीची हत्या करण्यात आली. यानंतर बाजारपेठ पोलिसांनी तातडीची कारवाई करत बापाला अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलिस तपासात हत्येमागील धक्कादायक कारण समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पश्चिमेतील पारनाका परिसरातील रचना रॉयल इमारतीत राहणाऱ्या विनोद वसईकरने आपल्या मुलगी गायत्री वसईकर हिची काही दिवसांपूर्वी हत्या केली होती. घटनेनंतर आरोपी विनोद वसईकर फरार झाले होते. मात्र बाजारपेठ पोलिसांनी विशेष पथकाच्या मदतीने शोधमोहीम राबवत त्यांना ताब्यात घेतले. पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, गायत्रीने काही महिन्यांपूर्वी कुटुंबाच्या विरोधात जाऊन प्रेमविवाह केला होता.

KALYAN HONOUR KILLING CASE: FATHER ARRESTED FOR MURDERING DAUGHTER OVER LOVE MARRIAGE
Monsoon Alert : १०० किमी वेगानं येतंय महाभयंकर संकट, मान्सून घालणार धुमाकूळ ; 'या' राज्यांना अलर्ट

मुलीच्या या निर्णयामुळे तिचे वडील विनोद वसईकर नाराज होते. त्यांनी यापूर्वी गायत्रीसाठी अनेक स्थळे पाहिली होती आणि तिचा साखरपुडाही ठरवला होता. मात्र गायत्रीने तो साखरपुडा मोडून आपल्या बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. यामुळे वडिलांच्या मनात तिच्याविषयी तीव्र नाराजी निर्माण झाली होती. लग्नानंतर गायत्री प्रथमच माहेरी आली होती. दुपारच्या जेवणानंतर घरात वडील आणि मुलीमध्ये प्रेमविवाहाच्या मुद्द्यावरून पुन्हा वाद झाला. पोलिसांच्या माहितीनुसार, “माझे काहीही न ऐकता तू लग्न केलेस, मी ते विसरलो नाही,” असे सांगत विनोदने मुलीशी वाद घातला. हा वाद इतका विकोपाला गेला की, संतापाच्या भरात त्याने धारदार शस्त्राने गायत्रीवर हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या गायत्रीचा जागीच मृत्यू झाला.

KALYAN HONOUR KILLING CASE: FATHER ARRESTED FOR MURDERING DAUGHTER OVER LOVE MARRIAGE
Shocking : धक्कादायक! पत्नीचे ३ वर्षांपासून अफेअर, पतीला कळताच बॉयफ्रेंडचा काढला काटा

घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला होता. मात्र बाजारपेठ पोलिसांनी तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे त्याचा शोध घेत अखेर त्याला अटक केली. सध्या आरोपीची कसून चौकशी सुरू असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. आरोपी विनोद वसईकर याला आज दुपारी कल्याण न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com