

लखनौत घडली हादरवणारी घटना
UPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीवर सामूहिक अत्याचार
पीडितेच्या तक्रारीवरून आरोपीविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल
उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये UPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तरुणीच्या ओळखीच्या तिघांनी घरात बांधून सामूहिक अत्याचार केला. या घटनेनंतर खळबळ उडाली असून पीडितेच्या तक्रारीवरून आरोपीविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी दिल्लीतील नामांकित कॉलेजमध्ये बीए ऑनर्सची विद्यार्थिनी आहे. तसेच पीडित विद्यार्थिनी UPSC परीक्षेची तयारी देखील करत आहे. कॉलेजला सुट्टी लागल्याने घरी जौनपूरला गेली होती. परंतु १५ मे रोजी तिच्या एका परीक्षेचं अॅडमिट कार्ड येणार होते. यासाठी ती सुहेलदेव एक्स्प्रेसने दिल्लीला जात होती.
ट्रेन सुरू झाल्यानंतर जुन्या मित्राने व्हॉट्सअॅपवर मेसेज केला. त्यानंतर ती लखनौच्या चारबाग रेल्वे स्टेशनवर पोहोचून मित्राला भेटली. त्यानंतर त्याने आणि त्याच्या एकरा मित्राने तिला बळजबरीने रेल्वे स्टेशनवर उतरवलं. आरोपींनी तरुणीला गोल सिटी भागातील मेदांता हॉस्पिटलजवळील एका घरात नेलं. काही वेळानंतर एक तरुण जेवण आणायला बाहेर गेला. जेवण आणल्यानंतर तिच्या मित्राने तिला कॉफी प्यायला सांगितलं. कॉफी प्यायल्यानंतर तिला गुंगी येऊ लागली. कॉफी पिऊन बेशुद्ध झालेल्या तरुणीवर दोन्ही नरधमांनी आळीपाळीने अत्याचार केला.दोघांनी तिच्यावर रात्रभर अत्याचार केला.
अत्याचार केल्यानंतर दुसर्या दिवशी मुख्य आरोपी घराबाहेर गेला. त्यानंतर दुसऱ्या दिवशीही घरात आल्यानंतर तरुणीवर अत्याचार करण्यात आलाय. त्यानंतर तिसऱ्या दिवशी दोघांचा आणखी एक मित्र घरी आला. या तिन्ही आरोपींनी मिळून सलग तीन अत्याचार केला.
तीन दिवसानंतर आरोपींनी तरुणीला चारबाग रेल्वे स्टेशनला घेऊन आले. त्यानंतर बळजबरीने ट्रेनमध्ये बसवून दिल्लीला पाठवले. ट्रेन बरेलीजवळ पोहोचल्यानंतर पीडित तरुणीने वडिलांनी सर्व घटना सांगितली. त्यानंतर रेल्वेच्या हेल्पलाइन १३९ वर सूचना दिली. तरुणीला काळजीपूर्वक दिल्लीला घेऊन गेले. त्यानंतर पोलिसांत आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.