बिझनेसमन बाप ओरडला, २२ वर्षीय मुलीने रागात मृत्यूला कवटाळलं; त्या दिवशी नेमकं काय घडलं?

uttar pradesh shocking : बिझनेसमन बाप ओरडवल्याने मुलीने इमारतीवरून उडी मारून आयुष्य संपवलं. मुलीच्या आत्महत्येने परिसरात खळबळ उडाली आहे.
uttar pradesh news
uttar pradesh shockingSaam tv
Published On
Summary

२२ वर्षीय बीटेक विद्यार्थिनीने इमारतीवरून उडी मारून केली आत्महत्या

अर्पिता जयस्वाल असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव

बापाने ओरडल्याने होती मानसिक तणावात

उत्तर प्रदेशच्या नोएडाच्या सेक्टर ३२ मधील अमौर सोसायटीत धक्कादायक घटना समोर आली आहे. २२ वर्षीय बीटेकच्या विद्यार्थिनीने इमारतीच्या २८ व्या मजल्यावरून उडी मारून आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तरुणीने उडी मारल्याने सोसायटीतील रहिवाशांमध्येही खळबळ उडाली. तरुणीने उडी मारल्याचे कळताच सोसायटीमधील रहिवाशांनी पोलिसांना माहिती दिली.

मीडिया रिपोर्टनुसार, तेल व्यावसायिक संजय जयस्वाल हे कुटुंबासहित अमौर सोसायटीत राहतात. त्यांची मुलगी अर्पिता जयस्वाल ही पंजाबच्या कॉलेजमध्ये बीटेकचे शिक्षण घेत होती. ती होळीच्या दिवशी घरी आली होती. जयस्वाल कुटुंबीयांनी रात्री उशिरा १० वाजता एकत्र जेवण केलं. कुटुंबाला मुलगी अर्पिताच्या मनात काय सुरू होतं, हे काहीच माहिती नव्हतं. रात्रीचे जेवण झाल्यानंतर काही तासानंतर अर्पिताने इमारतीवरून उडी मारली.

uttar pradesh news
मोठी बातमी! शहरात गुरूवारी मांस विक्री बंद; राज्यातील 'या' पालिकेचा मोठा निर्णय

पोलिसांच्या माहितीनुसार, अर्पिताने रात्री १२.२० वाजता उडी मारली. तिने उडी मारल्यानंतर मोठा आवाज झाला. त्यानंतर सुरक्षा रक्षकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. विद्यार्थिनी अर्पिता रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती. यानंतर सोसायटीचे अन्य सदस्य देखील घटनास्थळी देखील पोहोचले.

तिच्या नातेवाईकांनी तातडीने अर्पिताला रुग्णालयात दाखल केले. परंतु डॉक्टरने मृत घोषित केले. अर्पिताच्या मृत्यूने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी अर्पिताचा मृतदेह ताब्यात घेत पोस्टामार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. तसेच फॉरेन्सिक टीमने तपासाला सुरुवात केली आहे.

uttar pradesh news
Ashok Kharat case : भोंदू अशोक खरात सारख्यांना मारून टाकावं आणि विषय संपवावा - संभाजी भिडे

मानसिक तणावातून आत्महत्या

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, 'अर्पिता ही गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावात होती. आत्महत्या करण्याच्या एक दिवस आधी अर्पिताला तिच्या वडिलांनी ओरडलं होतं. या नाराजीतूनच अर्पिताने टोकाचं पाऊल उचललं. तिच्या नातेवाईकांनी कोणतीही तक्रार पोलिसांत दिलेली नाही. पोलिसांनी अर्पिताकडील मोबाइल फोन आणि साक्षीदारांना ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. अर्पिताचा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आल्यानंतर तिच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com