मोठी बातमी! शहरात गुरूवारी मांस विक्री बंद; राज्यातील 'या' पालिकेचा मोठा निर्णय

akkalkot news : अक्कलकोट शहरात गुरूवारी मांस विक्री बंद राहणार आहे. अक्कलकोट नगरपरिषदेने हा निर्णय घेण्यात आलाय.
akkalkot city news
akkalkot citySaam tv
Published On
Summary

अक्कलकोट नगरीमध्ये नगरपालिकेचा महत्त्वपूर्ण निर्णय

प्रत्येक गुरुवारी मांस विक्री बंद ठेवण्याचा नगराध्यक्षांचा निर्णय

नगरपालिकेच्या निर्णयाचे सर्वत्र स्वागत

सोलापूरच्या अक्कलकोट नगरपालिकेने शहरातील स्वच्छता आणि आरोग्याच्या दृष्टीने तंबाखूजन्य मावा विक्रीविरोधात कडक पावले उचलली होती. काही दिवसांपूर्वी शहरात मावा विक्री बंद करण्याचा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या मावा विक्रीबंदीनंतर आता शहरात गुरूवारी मांस विक्री बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अक्कलकोट नगरपरिषदेच्या निर्णयाचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे.

akkalkot city news
बडे अधिकारीही खरातच्या जाळ्यात? खरातच्या 'दरबारा'तला डेप्युटी कलेक्टर कोण?

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या सोलापूरच्या अक्कलकोट नगरीमध्ये नगरपालिकेने गुरूवारी मांस विक्री बंद करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. नगरपालिकेच्या निर्णयानुसार, प्रत्येक गुरुवारी मांस विक्री बंद ठेवण्याचा महत्वपूर्ण निर्णय नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी यांनी घेतला आहे. नगपालिकेच्या निर्णयाचे स्वामीभक्त आणि अक्कलकोटवासियांकडून अक्कलकोट नगरपरिषदेच्या महत्त्वपूर्ण निर्णयाचे उत्स्फूर्त स्वागत केले जात आहे.

akkalkot city news
भोंदूबाबाच्या विकृतीचा पॅटर्न, कवडीमोल चिंचोके, लाखोंना विकले, नकली साप आणि वाघानं गंडवलं

गेल्या अनेक वर्षांपासून स्वामी भक्तांकडून होत असलेली मागणी अखेर पूर्ण झाली आहे. मावाबंदीच्या महत्त्वपूर्ण निर्णयानंतर आता प्रत्येक गुरुवारी मांस विक्री बंदचा नगरपरिषदेचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानंतर नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी यांनी माध्यमांशी संवाद साधत माहिती दिली.

akkalkot city news
Kharat Case : भोंदू अशोक खरातच्या फार्महाऊसवर कोणते राजकीय नेते, VIP जायचे? SIT चौकशीत सगळ्यांची नावं उघड

नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी म्हणाले, अक्कलकोट शहर हे स्वामी समर्थ महाराजांमुळे देशभरात प्रसिद्ध आहे. देशभरातून लाखो भाविक शहरात येत असतात. या पार्श्वभूमीवर शहरात गुरुवारी मांस विक्री बंदीची मागणी नागरिकांनी केली होती. यामुळे शहरात गुरुवारी मांस विक्री बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com