Ashok Kharat case : भोंदू अशोक खरात सारख्यांना मारून टाकावं आणि विषय संपवावा - संभाजी भिडे

Ashok Kharat case update : भोंदू खरात प्रकरणावर संभाजी भिडे यांनी भाष्य केले. यावेळी त्यांनी खरात सारख्यांना मारून टाकावं, अशी प्रतिक्रिया दिली.
sambaji bhide on ashok kharat case
sambaji bhide Saam tv
Published On
Summary

अशोक खरात प्रकरणावर संभाजी भिडे यांची प्रतिक्रिया

संभाजी भिडे यांच्याकडून खरातवर कडक कारवाईची मागणी

भिडे यांनी लव्ह जिहादवरही केलं भाष्य

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. पोलिसांच्या चौकशीत भोंदू खरातचे अनेक कारनामे उघड होऊ लागले आहेत. त्याने कमावलेली कोट्यवधींच्या संपत्तीची माहिती समोर आली आहे. भोंदू खरातने शेकडो महिलांवर लैंगिक शोषण केलं आहे. त्याच्याविरोधात आतापर्यंत १० गुन्हे दाखल झाले आहेत. त्याच्यावर ५ नरबळी दिल्याचाही आरोप आहे. या भोंदू खरातवर कडक कारवाईची मागणी केली जात आहे. या प्रकरणावर शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे यांनी प्रतिक्रिया दिली. 'अशोक खरातला मारून टाकून विषय संपवावा, अशी प्रतिक्रिया शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे यांनी दिले. ते पुण्यात बोलत होते.

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे यांनी पुण्यात श्रीराम नवमीनिमित्त हजेरी लावली. त्यांनी राज्यातील लव्ह जिहाद आणि भोंदू अशोक खरात प्रकरणावर भाष्य केलं. संभाजी भिडे म्हणाले, 'आपल्या जीवनातला प्रत्येक दिवस आपण रामनवमी मानला पाहिजे. यावेळी त्यांनी राम स्तोत्र म्हटलं. हे सगळं ठीक आहे. राम तत्वाला हरताळ फासणाऱ्या लोकांचा निर्णय बंदोबस्त करण्याची प्रकृती माणसात आणि समाजात असली पाहिजे.

sambaji bhide on ashok kharat case
Kharat Case : भोंदू अशोक खरातच्या फार्महाऊसवर कोणते राजकीय नेते, VIP जायचे? SIT चौकशीत सगळ्यांची नावं उघड

'प्राणीमात्रात राम आहे. असा सिद्धांत मांडून सापाला सोडता कामा नये. सापाला चेचला पाहिजे. राम प्रत्येक प्राण्यात असला पाहिजे. हा हिशोब हिंदुस्तान चुकला तर हिंदुस्तानी स्वातंत्र्य गमावलं ते गमू नये, असं वाटत असेल तर. कडव्या वृत्तीचा हिंदू समाज होणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.

sambaji bhide on ashok kharat case
Kharat Case : भोंदू अशोक खरताचा एन्काऊंटर होणार, राज्यातील दिग्गज नेत्यानं सांगितलं कारण

भिडे यांनी यावेळी लव्ह जिहादवरही भाष्य केलं. 'लव्ह जिहाद कशा पद्धतीने रोखले गेले पाहिजेत. या सगळ्याच काळात घडणार आहे'. तर भोंदू खरातवर भिडे यांनी भाष्य केलं. भिडे म्हणाले, 'रामाचा आदर्श ठेवून रोखलं पाहिजे. भगवान श्रीकृष्ण जसे महत्वाचे आहे. तसे छत्रपती शिवाजी महाराज महत्वाचे... राम आणि कृष्ण दोन्ही देव महत्वाचे आहे. ते भगवान असले तरी शिवाजी महाराज सर्वात प्रभावी अत्यावश्यक आहेत'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com