Shocking: साखरपुड्यात रक्तरंजित थरार! फोटो काढायला नकार दिल्याने तरुणाची सटकली, वेटरवर धाडधाड गोळ्या झाडल्या

Greater Noida firing: उत्तर प्रदेशच्या ग्रेटर नोएडामध्ये भयंकर घटना घडली. साखरपुडा समारंभात गोळीबार करण्यात आला. फोटो काढायला नकार दिल्यामुळे संतप्त झालेल्या तरुणाने गोळीबार केला.
खळबळजनक! लग्न करण्यास नकार दिला; मंडपातच बापाने मुलीवर गोळ्या झाडल्या
Greater Noida firingSaam tv
Published On

Summary -

  • ग्रेटर नोएडामध्ये साखरपुडा समारंभात गोळीबार

  • फोटो काढण्यास नकार दिल्याने तरुणाने वेटरवर गोळी झाडली

  • वेटरच्या पोटात गोळी घुसली असून तो गंभीर जखमी झाला

  • पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली

उत्तर प्रदेशच्या ग्रेटर नोएडामधील बिसरख गावात एका साखरपुडा सोहळ्यामध्ये गोळीबाराची घटना घडली. फोटो काढण्यास नकार दिल्याने एका तरुणाने वेटरवर गोळ्या झाडल्या. या गोळीबारामध्ये वेटर गंभीर जखमी झाला आहे. वेटरच्या पोटात गोळी लागली असून सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना बुधवारी रात्री घडली. गोळीबार करणाऱ्या आरोपी तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी बिसरख गावात अंकित भाटी नावाच्या तरुणाचा साखरपुडा सुरू होता. गाझियाबादमधील रिस्तल गावातील दुर्गेश नावाच्या तरुणाने साखरपुडा समारंभात हजेरी लावली. त्याच्याकडे बेकायदेशीर पिस्तूल होती. दुर्गेश आणि त्याचे साथीदार दारूच्या नशेत होते. समारोप समारंभाच्या वेळी वेटर सामान बांधत होते. दरम्यान, दुर्गेशने पुष्पेंद्र नावाच्या वेटरला फोटो काढण्यास सांगितले. पुष्पेंद्रने एक फोटो काढला. त्यानंतर दुर्गेशने आणखी काही फोटो आणि व्हिडिओ काढायला सांगितले.

खळबळजनक! लग्न करण्यास नकार दिला; मंडपातच बापाने मुलीवर गोळ्या झाडल्या
Crime: ३ वर्षांच्या मुलीची बलात्कार करून हत्या, मृतदेह खड्ड्यात पुरला; शेजारी राहणाऱ्या तरुणाचं भयानक कृत्य

सामान पॅक करण्यास उशीर झाल्यामुळे पुष्पेंद्रने फोटो आणि व्हिडिओ काढण्यास नकार दिला. यामुळे संतापलेल्या दुर्गेशने सोबत आणलेल्या पिस्तूलमधून वेटर पुष्पेंद्रवर गोळी झाडली. गोळी थेट पुष्पेंद्रच्या पोटात घुसली. पुष्पेंद्र जमिनीवर पडला, आणी मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊ लागला. या गोळीबाराच्या घटनेमुळे साखरपुडा समारंभात आलेले नातेवाईक इकडे तिकडे पळू लागले त्यामुळे चेंगराचेंगरी झाली. जखमी झालेल्या वेटरला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यामुळे त्याचे प्राण वाचले.

खळबळजनक! लग्न करण्यास नकार दिला; मंडपातच बापाने मुलीवर गोळ्या झाडल्या
Pune Crime: पुण्यात मध्यरात्री गोळीबाराचा थरार, धाडधाड करत ३ गोळ्या झाडल्या; नागरिक घाबरले

पोलिसांनी आरोपी दुर्गेशला अटक केली. त्याच्याकडून एक बेकायदेशीर पिस्तूल जप्त करण्यात आली आहे. पोलिस या प्रकरणाची चौकशी करत आहेत आणि आरोपीविरुद्ध आवश्यक ती कारवाई केली जात असल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्याने दिली. आरोपी साखरपुडा समारंभात लोकांना दाखवण्यासाठी बेकायदेशीर पिस्तूल घेऊन आला होता. ही घटना घडली तेव्हा तो दारूच्या नशेत होता आणि तो पिस्तूल दाखवत फोटो आणि व्हिडीओ काढत होता. आरोपीने वेटरला अनेक वेळा त्याचा फोटो काढून व्हिडिओ बनवण्यास सांगितले होते. शेवटी वैतागून वेटरने फोटो काढण्यास नकार दिला. त्यामुळे संतप्त होत दुर्गेशने त्याच्यावर गोळी झाडली.

खळबळजनक! लग्न करण्यास नकार दिला; मंडपातच बापाने मुलीवर गोळ्या झाडल्या
Crime News: रील स्टार होण्याच्या नादात मैत्रिणीच्याच घरात केली चोरी; १९ वर्षीय तरुणीसह चार जणांना अटक

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com