Crime News: रील स्टार होण्याच्या नादात मैत्रिणीच्याच घरात केली चोरी; १९ वर्षीय तरुणीसह चार जणांना अटक

Crime News: रील स्टार होण्याच्या नादात 19 वर्षीय तरुणीने मैत्रिणीच्याच घरात चोरी केली. अकोला पोलिसांनी तरुणीसह चार आरोपींना अटक केली. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
gold worth 21 lakh rupees to become reels star
gold worth 21 lakh rupees to become reels star Saam tv
Published On

अक्षय गवळी, अकोला, साम टिव्ही

Crime News: रील स्टार होण्याच्या नादात एका 19 वर्षीय तरुणीने थेट चोरीचा मार्ग निवडला. रिल्ससाठी कॅमेरा, महागडा मोबाईल आणि इतर साहित्य घेण्यासाठी या 19 वर्षीय तरुणीने तिच्या मैत्रिणीच्या घरातील डल्ला मारलाय. जवळपास 21 लाखांचे दागिने तिने लंपास केले. अखेर पोलिसांनी चोरीप्रकरणी तरुणीला अटक केली असून तिच्यासह अन्य 3 जणांना गजाआड केल आहे. समीक्षा गवई असं अटक केलेल्या तरुणीचं नाव आहे. वैभव गोपनारायण, ऋतीक श्रृंगारे, समीर तेलखडे असे तिच्या इतर अन्य साथीदारांची नावे आहे.

नेमकं काय घडलं?

अकोल्यातील जुने शहर पोलीस स्टेशन हद्दीतल्या सागर कॉलनी भागात राहणारी फिर्यादी नेहा सावदेकर आणि समीक्षा हे दोघे एकमेकांना चांगले ओळखतात. या तरुणीने फिर्यादी नेहाला रील बनवण्यासाठी घरी बोलावलं. त्यानंतर काहीतरी कामानिमित्त घराबाहेर पडली. आणि नेहाला आपल्या घरात गुंतवून बसवून ठेवलं, तितक्यातच समीक्षाने नेहाच्या घरात प्रवेश केला आणि दाग दागिने लंपास केले.

gold worth 21 lakh rupees to become reels star
Famous Influencer Death: प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएंसरचं निधन; अवघ्या २० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

यामध्ये सोन्याचा नेकलेस वजन 52 ग्रम, सोन्याचे 2 मोठे नेकलेस वजन 40 ग्रॅम, सोन्याचे चेन व लॉकेट 12 ग्रॅम, सोन्याच्या 3 अंगठया वजन 15 ग्रॅम, सोन्याचे 2 पोत वजन 20 ग्रॅम, ब्रेसलेट 3 ग्रॅम, लहान नेकलेस वजन 18 ग्रॅम आणि रोख रक्कम 90 हजार असा मुद्देमाल चोरी केला.

gold worth 21 lakh rupees to become reels star
Ranveer Singh Case: रणवीर सिंगला धमकी प्रकरणात मोठी कारवाई; लॉरेन्स गँगच्या हॅरी बॉक्सरवर लूकआउट नोटीस

पोलिसांच्या तपासादरम्यान, समीक्षा गवईच्याने प्रियकर ऋतिक शृंगारेच्या मदतीने हे सर्व चोरीचा प्रकार घडवून आणल्याचे समोर आले. आज पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं असून तिच्याकडून 138 ग्रॅम सोनं त्याची किंमत 21 लाख इतकी आहे, तर 50 हजार रुपये रोख जप्त केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com