Ranveer Singh Case: रणवीर सिंगला धमकी प्रकरणात मोठी कारवाई; लॉरेन्स गँगच्या हॅरी बॉक्सरवर लूकआउट नोटीस

Ranveer Singh Case: 'धुरंधर' अभिनेता रणवीर सिंगला धमकी दिल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने हॅरी बॉक्सरविरुद्ध लूकआउट नोटीस जारी केली आहे. पोलिस आता या लॉरेन्स बिश्नोई टोळीतील सदस्याचा शोध घेत आहेत.
Ranveer Singh Case
Ranveer Singh CaseSaam tv
Published On

Ranveer Singh Case: अलिकडेच, लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सदस्य हॅरी बॉक्सर याने अभिनेता रणवीर सिंगला १० कोटींच्या खंडणीची धमकी देणारा व्हॉइस मेसेज पाठवला. हा व्हॉइस नोट एका अमेरिकन नंबरवरून रणवीरच्या मॅनेजरला पाठवण्यात आला होता. या घटनेनंतर रणवीर सिंगची सुरक्षा वाढवण्यात आली. मुंबई क्राइम ब्रँचने आता या प्रकरणात महत्त्वपूर्ण कारवाई केली आहे. रणवीर सिंगला धमकी दिल्याबद्दल त्यांनी हॅरी बॉक्सर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हरिचंद्रविरुद्ध लूक आउट सर्क्युलर (LOC) जारी केला आहे.

मुंबई पोलिसांनी ही माहिती दिली. त्यांनी असेही म्हटले आहे की रणवीर सिंगच्या मॅनेजरला मिळालेली धमकीचा व्हॉइस नोट पडताळणीसाठी पंजाब आणि हरियाणाला पाठवण्यात आला होता. व्हॉइस नोट पाठवणाऱ्याने स्वतःची ओळख हॅरी बॉक्सर म्हणून केली आणि १० कोटींची खंडणी मागितली. मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रँच टीमने रणवीरला ज्या अमेरिकन नंबरवरून खंडणीसाठी व्हॉइस नोट पाठवण्यात आला होता त्या नंबरची चौकशी करण्यासाठी अमेरिकन एजन्सींशी संपर्क साधला होता.

Ranveer Singh Case
Famous Influencer Death: प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएंसरचं निधन; अवघ्या २० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सदस्य हॅरी बॉक्सरने रणवीर सिंगकडे १० कोटी रुपयांची मागणी करणारा धमकीचा व्हॉइस नोट पाठवला होता. पडताळणी केल्यानंतर, हा आवाज हॅरी बॉक्सरच्या आवाजासारखाच असल्याचे आढळून आले. चित्रपट निर्माते रोहित शेट्टीच्या घरावर झालेल्या गोळीबारानंतर २ फेब्रुवारी २०२६ रोजी रणवीर सिंगला धमकीची व्हॉइस नोट पाठवण्यात आल होता.

Ranveer Singh Case
Rohit Shetty: बहिणीच्या लग्नाचं कर्ज फेडण्यासाठी रोहित शेट्टीच्या घरी झाडल्या गोळ्या, तपासात धक्कादायक खुलासा

लूकआउट नोटीस जारी

मंगळवार, १७ फेब्रुवारी रोजी पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरनुसार, लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सदस्य हॅरी बॉक्सरकडून रणवीर सिंगला अनेक धमकीचे फोन आले होते, ज्यात १० कोटी रुपयांची खंडणी मागितली गेली होती. पंजाब आणि हरियाणा पोलिसांनी हा आवाज हॅरी बॉक्सरचा असल्याची माहिती दिल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. त्यानंतर पोलिसांनी हॅरी बॉक्सरविरुद्ध लूकआउट सर्क्युलर (एलओसी) जारी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com