Dhule Accident : काळीज पिळवटून टाकणारी घटना, भीषण अपघातात बापलेकाचा करूण अंत, मायलेक गंभीर जखमी

Dhule Accident News : धुळ्याजवळ अवधान येथे भीषण अपघात झाला. ट्रकच्या धडकेत दुचाकीवरून निघालेल्या बाप-लेकाचा दुर्दैवी अंत झाला. तर पत्नीसह दीड वर्षाची मुलगी गंभीर जखमी झाली आहे.
दुचाकीवरून निघालं होतं कुटुंब, ट्रकच्या धडकेत बापलेकाचा दुर्दैवी मृत्यू
Dhule Accidentsaam tv
Published On
Summary
  • धुळ्याजवळ अवधान येथे भीषण अपघात

  • ट्रकच्या धडकेत बाप-लेकाचा दुर्दैवी अंत

  • पत्नीसह दीड वर्षाची मुलगी गंभीर

  • ट्रकचालकाला पोलिसांनी घेतलं ताब्यात

भूषण अहिरे, धुळे | साम टीव्ही प्रतिनिधी

मुंबई-आग्रा महामार्गावर धुळ्याजवळ अवधान गावाजवळ काळीज पिळवटून टाकणारी दुर्घटना घडली. धुळ्याहून मालेगावकडे जाणाऱ्या लेनवर एका हॉटेलसमोरच भरधाव ट्रकने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीस्वार लक्ष्मण निंबा गुंजाळ (वय ३५) आणि त्यांचा अवघा तीन वर्षांचा मुलगा आदित्य लक्ष्मण गुंजाळ या दोघांचा जागीच मृत्यू झाला.

लक्ष्मण गुंजाळ हे आपल्या पत्नी आणि दोन मुलांसह दुचाकीने गाणेगावकडे जात होते. त्याचवेळी अवधान गावच्या हद्दीत त्यांच्यावर काळाने झडप घातली. ट्रकने त्यांच्या दुचाकीला मागून धडक दिली. यात लक्ष्मण यांच्यासह त्यांचा अवघ्या तीन वर्षांचा मुलगा आदित्य जागीच मरण पावला.

दुचाकीवरून निघालं होतं कुटुंब, ट्रकच्या धडकेत बापलेकाचा दुर्दैवी मृत्यू
Accident News : एसटी बसची ऑटोला धडक, भीषण अपघातात ४ जणांचा जागीच मृत्यू; मृतांमध्ये शाळकरी मुलाचा समावेश

या अपघातामध्ये लक्ष्मण यांच्या पत्नी भाग्यश्री लक्ष्मण गुंजाळ (वय ३०) आणि त्यांची दीड वर्षाची मुलगी जयश्री या दोघी गंभीर जखमी झाल्या आहेत. या अपघाताची माहिती मिळताच मोहाडी नगर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना तात्काळ धुळे जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले. अवधान गावाजवळ झालेल्या या अपघातानंतर पोलिसांनी ट्रक जप्त केला. तसेच चालकाला ताब्यात घेतलं.

दुचाकीवरून निघालं होतं कुटुंब, ट्रकच्या धडकेत बापलेकाचा दुर्दैवी मृत्यू
Accident : ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी १८ दिवसापूर्वी पुण्यातून निघाले, पण गुजरातमध्ये काळाने घात केला; ३ जिवलग मित्रांचा अपघाती मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com