IAS Officer Transfer: मोठी बातमी! 38 आयएएस अधिकाऱ्यांच्या मध्यरात्री तडकाफडकी बदल्या, प्रशासनात खळबळ

Uttar Pradesh News: उत्तर प्रदेशमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठे प्रशासकीय बदल करण्यात आले आहेत. 38 आयएएस अधिकाऱ्यांच्या मध्यरात्री तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या.
IAS Officer Transfer: मोठी बातमी! 38 आयएएस अधिकाऱ्यांच्या मध्यरात्री तडकाफडकी बदल्या, प्रशासनात खळबळ
IAS OFFICERS TRANSFERRED IN UTTAR PRADESHsaam tv
Published On: 

उत्तर प्रदेस विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू झाली आहे. विधानसभा निवडणुका लक्षात घेता भारतीय निवडणूक आयोगाने अधिकाऱ्यांच्या बदल्यांसंदर्भात दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार राज्य सरकारने प्रशासकीय स्तरावर मोठा फेरबदल केला. राज्य सरकारने शुक्रवारी रात्री उशिरा मोठा प्रशासकीय फेरबदल करत ३८ आयएएस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या केल्या. यामध्ये अनेक बड्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे प्रशासनात मोठी खळबळ उडाली.

एसएसआरच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश सरकारने ३८ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यासंदर्भात अधिकृत अधिसूचना जारी केली. यामध्ये ५ जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, लखनऊ आणि मेरठ विकास प्राधिकरणांचे उपाध्यक्ष, गाझियाबाद आणि वाराणसीचे महानगरपालिका आयुक्त आणि ७ मुख्य विकास अधिकाऱ्यांचा समावेश आहे. एसएसआरपूर्वी करण्यात आलेल्या या बदल्या निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार असल्याचे सांगितले जात आहे.

IAS Officer Transfer: मोठी बातमी! 38 आयएएस अधिकाऱ्यांच्या मध्यरात्री तडकाफडकी बदल्या, प्रशासनात खळबळ
तुकाराम मुंढेंना IAS ऐवजी IPS व्हायचं होतं? मुलाखतीतील प्रश्नावर मुंढेंचं भन्नाट उत्तर, पाहा व्हिडिओ

भारतीय निवडणूक आयोगाने २७ ऑक्टोबर रोजी अधिकाऱ्यांच्या बदल्यांसंदर्भात मार्गदर्शक तत्वे जारी केली होती. यामध्ये स्पष्टपणे निर्देश दिले होते की, ज्या अधिकाऱ्यांनी ३१ मे २०२७ पर्यंत जिल्ह्यात तीन वर्षांची सेवा पूर्ण केली आहे त्यांची बदली करण्यात यावी. हा नियम महानगरपालिका आणि विकास प्राधिकरणांमध्ये कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांनाही लागू होतो.

मागील विधानसभा निवडणूक किंवा पोटनिवडणुकीच्या वेळी नियुक्त झालेल्या अधिकाऱ्यांची त्याच विधानसभा मतदारसंघात किंवा जिल्ह्यात पुनर्नियुक्ती करू नये, असे देखील निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. आयोगाने या संदर्भात मुख्य सचिवांना ३० नोव्हेंबरपर्यंत अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार, सरकारने सीतापूर, महाराजगंज, सिद्धार्थनगर, मुझफ्फरनगर आणि बिजनौर येथील जिल्हाधिकाऱ्यांची अदलाबदल केली आहे.

IAS Officer Transfer: मोठी बातमी! 38 आयएएस अधिकाऱ्यांच्या मध्यरात्री तडकाफडकी बदल्या, प्रशासनात खळबळ
ऐन दिवाळीत 35 IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; प्रशासनात खळबळ, कोणाची कुठे नियुक्ती?

निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, नियुक्ती आणि कार्मिक विभागाने सीतापूर, महाराजगंज, सिद्धार्थनगर, मुझफ्फरनगर आणि बिजनौर येथील जिल्हाधिकाऱ्यांची बदली केली आहे. राजगणपती आर. यांना सीतापूर जिल्हाधिकारी पदावरून हटवून एसयूडीएचे संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. लखनऊ विकास प्राधिकरणाचे उपाध्यक्ष प्रथमेश कुमार यांची सीतापूरचे नवे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. महाराजगंज आणि सिद्धार्थनगर येथील जिल्हाधिकाऱ्यांचीही अदलाबदल करण्यात आली आहे. यांच्यासोबत अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

IAS Officer Transfer: मोठी बातमी! 38 आयएएस अधिकाऱ्यांच्या मध्यरात्री तडकाफडकी बदल्या, प्रशासनात खळबळ
10 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कुंभमेळा प्रशासनात ही मोठा फेरबदल, कोणाची कुठे नियुक्ती?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.