तुकाराम मुंढेंना IAS ऐवजी IPS व्हायचं होतं? मुलाखतीतील प्रश्नावर मुंढेंचं भन्नाट उत्तर, पाहा व्हिडिओ

IAS Tukaram Mundhe FDA Commissioner : तुकाराम मुंढेंना IAS ऐवजी IPS व्हायचं होतं का? साम टीव्हीच्या ब्लॅक अॅण्ड व्हाईट कार्यक्रमात विचारलेल्या या प्रश्नावर मुंढेंनी दिलेलं भन्नाट उत्तर वाचा.

IAS म्हटलं की आपल्यातील अनेकांच्या डोळ्यासमोर तुकाराम मुंढेंचा चेहरा येत असतो. महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त झाल्यानंतर तुकाराम मुंढेंनी कारवाईंचा धडाका लावलाय. मुंढेंच्या धडक कारवाईमुळे भेसळ माफियांचे धाबे दणाणले आहेत. तुकाराम मुंढे जेथे जातात तेथे थेट परवाना निलंबनाची कारवाई करतात. गैर व्यवहार करणाऱ्यांना ते माफी देत नाहीत, त्यांच्यावर थेट कारवाईचा बडगा उगारतात. मुंढेंच्या कार्य पद्धत पाहून त्यांना आयएएस ऐवजी आयपीएस बनवायंच होतं का? असा सवाल अनेकजण करतात.

साम टीव्हीच्या ब्लॅक अॅण्ड व्हाईट या कार्यक्रमात झालेल्या त्यांच्या मुलाखतीत त्यांना IAS ऐवजी IPS व्हायचं होतं? का असा प्रश्न विचारण्यात आला. त्या प्रश्नावर त्यांनी अप्रतिम उत्तर दिलंय. पर्सनॅलिटी पाहून अनेकांना वाटतं की मुंढे आयएएसपेक्षा आयपीएस असायला हवे होते. त्यामुळे खुद्द तुकाराम मुंढेंना कधी आपण IAS ऐवजी IPS व्हायला पाहिजे होतं असं वाटलंय का? या प्रश्न तुकाराम मुंढेंनी शानदार उत्तर दिलंय. उत्तर देताना मुंढे म्हणाले की, मला असं कधी वाटलं नाही. बेसिकली मला तसं काय वाटत नाही. माझं फोडून काढणं हा स्वभाव नाहीये. माझं बेसिक नेचर इम्प्रू करणं आणि डेव्लपमेंट करणं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.