निवडणूक आयोगाने सुरू केलेल्या SIR प्रक्रियेला आता आणखी मुदतवाढ मिळणार आहे. सध्या देशभरात SIR सुरू आहे. यामध्ये दुबार नावे, मृत झालेल्या व्यक्तींचे नावे वगळले जात आहे. याबाबत आता महत्वाची अपडेट समोर आली आहे. SIR मोहिमेदरम्यान मतदार यादीतून नाव वगळण्यातून आलेल्या मतदारांना निवडणूक आयोगाने आणखी एक संधी देण्याचाअ निर्णय घेतला आहे. अनुपस्थित, स्थलांतरित, मृत आणि दुबार म्हणून चिन्हांकित करण्यात आलेल्या मतदारांना ही संधी मिळणार आहे.
या मतदारांना गणना फॉर्म देण्यात आले होते. मात्र, हे फॉर्म परत न मिळाल्याने सुरू असलेल्या SIR मोहिमेदरम्यान त्यांची नावे प्रारूप मतदार यादीतून वगळण्यात आली होती. आता अशा मतदारांना पुन्हा एकदा संधी देण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. निवडणूक आयोगाचे हे निर्देश दिल्ली, महाराष्ट्र, हरियाणा, आंध्र प्रदेश, झारखंड, तेलंगणा आणि नागालँड या सात राज्यांना लागू असणार आहेत. यासोबतच पात्र मतदार अंतिम मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नयेत, यासाठी स्वतंत्र देखरेख यंत्रणा उभारण्याचे निर्देशही आयोगाने अधिकाऱ्यांना दिले आहेत.
तसेच, मतदार यादीत दुबार नोंदणी होऊ नये, याची खबरदारी घेण्याचेही आयोगाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे SIR प्रक्रियेतून वगळल्या गेलेल्या मतदारांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.