PM Modi Speech : कठीण काळातही भारतावरील विश्वास वाढला, UPI ते GDP...पंतप्रधान मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे

PM Modi’s Speech At Global Fintech Fest 2026 : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुंबईतील ग्लोबल फिनटेक फेस्ट २०२६ ला संबोधित केलं. कठीण काळातही जागतिक स्तरावर भारतावरील विश्वास वृद्धिंगत झाला, असं प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुंबईत आयोजित ग्लोबल फिनटेक फेस्ट २०२६ ला संबोधित केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुंबईत आयोजित ग्लोबल फिनटेक फेस्ट २०२६ ला संबोधित केले. saam tv
Published On

कठीण काळातही जगात भारतावरील विश्वास अधिक वाढला, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत आयोजित ग्लोबल फिनटेक फेस्ट २०२६ (Global Fintech Fest 2026) मध्ये केले. संपूर्ण जग संघर्षमय आणि अनिश्चिततेच्या काळातून जात आहे. जगभरात इंधनावरून तणाव वाढलेला आहे. त्यातही भारत ७.८ टक्क्यांच्या विकासदराने प्रगती करत आहे. हा विश्वास तुमच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसतो, असंही मोदी म्हणाले.

पंतप्रधान मोदींनी यूपीआयबाबतही भाष्य केले. फिनटेकची चर्चा झाली तरी, ती यूपीआय (UPI) शिवाय अपूर्ण असेल. यूपीआयने २५ ऑगस्टला १० वर्षे पूर्ण केली आहेत. तुमची बँक तुमच्या फिंगर पॉइंटवर असेल असे मी म्हणायचो. त्यावेळी काही लोकांना ती अशक्यप्राय गोष्ट वाटायची. पण आता यूपीआय (UPI) भारतातच मर्यादित राहिले नाही. तर भारताचा यूपीआय जगातील ११ देशांतही आहे, अशी माहिती मोदींनी यावेळी दिली.

मला पॉलिसी आणि गव्हर्नंसशी जोडला जाऊन २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. पण मोदी एका टप्प्यावर पोहोचून आनंद साजरे करणाऱ्यातील नाहीत. आज आणखी एक हॅट्ट्रिक पूर्ण झाली आहे, याचा मला अत्यंत आनंद आहे. एक हॅट्ट्रिक ही २०२४ मध्ये तिसऱ्यांदा सरकार स्थापन करून झाली होती आणि ही हॅट्ट्रिक तुमच्या सर्वांमध्ये येण्याशी संबंधित आहे. ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये येण्याचे हे माझे सलग तिसरे वर्ष आहे, असे मोदी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुंबईत आयोजित ग्लोबल फिनटेक फेस्ट २०२६ ला संबोधित केले.
PM Modi : नरेंद्र मोदींच्या आयुष्यातील ही सर्वात मोठी चूक; संजय राऊतांच्या विधानाने खळबळ, अमित शाहांवर डागली तोफ

विकासित भारतासाठी तुम्ही किती महत्वाचे आहात, हे या हॅट्ट्रिकच्या माध्यमातून दिसून येते. तुमचं काम किती महत्वाचं आहे, दरवेळी मी येथे येतो तेव्हा माझ्याआधीच येथे सर्वाधिक युवक आलेले दिसतात. आधीपेक्षा जास्त ऊर्जा अनुभवायला मिळते. मला स्पष्टपणे दिसतेय की जोखीम घेण्याची क्षमता वाढत आहे. स्वप्ने अधिक ठळक दिसून येत आहेत. त्यामुळेच विकसित भारताच्या भविष्याबाबत माझा विश्वास अधिक दृढ होत आहे, असेही मोदी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुंबईत आयोजित ग्लोबल फिनटेक फेस्ट २०२६ ला संबोधित केले.
PM Modi: पंतप्रधान मोदींची सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न, BKC मधील कार्यक्रमस्थळी दोघांना अटक; पिस्तुल सापडल्यानं खळबळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com