PM Modi: पंतप्रधान मोदींची सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न, BKC मधील कार्यक्रमस्थळी दोघांना अटक; पिस्तुल सापडल्यानं खळबळ

PM Modi Mumbai Visit: पीएम मोदी यांच्या मुंबई दौऱ्यापूर्वी पोलिसांनी मोठी कारवाई करत दोघांना अटक केली. पिस्तुलासह एकाला पकडण्यात आले. तर दुसऱ्याला बनावट सैनिकाच्या वेशात अटक करण्यात आली.
PM Modi: पीएम मोदींच्या दौऱ्यापूर्वी मोठी कारवाई, मुंबई पोलिसांकडून दोघांना अटक
PM Narendra ModiSaam Tv
Published On
  • पीएम मोदींच्या मुंबई दौऱ्यापूर्वी पोलिसांची मोठी कारवाई

  • दोन संशयितांना पोलिसांनी अटक केली

  • बीकेसीमध्ये पिस्तूल घेऊन आलेल्या व्यक्तीला अटक

  • बनावट सैनिकाच्या वेशात व्हीआयपी क्षेत्रात एकाचा प्रवेश करण्याचा प्रयत्न

  • नरेंद्र मोदींच्या मुंबई दौऱ्यापूर्वी सुरक्षा यंत्रणेत खळबळ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यापूर्वी मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली. मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणांची धावपळ उडवणारी घटना समोर आली. मुंबईतील बीकेसी परिसरात पीएम मोदींच्या जाहीर सभेपूर्वी पोलिसांनी २ संशयितांना अटक करण्यात आली. यातील एका व्यक्तीकडून पिस्तुल जप्त करण्यात आल्याने सुरक्षा व्यवस्थेत मोठी खळबळ उडाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी मुंबईत दाखल होणार असून बीकेसी येथील नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमध्ये आयोजित कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत. मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रमस्थळी कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच बनावट ओळखपत्र आणि बंदुकीसह दोघांना अटक करण्यात आली. या प्रकारामुळे सुरक्षा यंत्रणांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

PM Modi: पीएम मोदींच्या दौऱ्यापूर्वी मोठी कारवाई, मुंबई पोलिसांकडून दोघांना अटक
Mumbai News: 'भोजपुरी बोला, मगच जेवण मिळेल', मुंबईत परप्रांतीयांची दादागिरी; VIDEO व्हायरल

बीकेसी येथील नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमध्ये सुरक्षा तपासणी सुरू असताना दोन संशयित व्यक्ती आढळून आल्या. त्यांच्यावर सुरक्षा यंत्रणांना संशय आल्याने दोघांना तातडीने ताब्यात घेण्यात आले. त्यापैकी रोहन पारेखने (२४ वर्षे) आपण पंतप्रधान कार्यालयातील अधिकारी असल्याचे सांगितल्याची माहिती समोर आली आहे. सुरक्षा तपासणीदरम्यान रोहन पारेख याच्याकडे PMO कार्यालयाचे बनावट ओळखपत्र आढळल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. ओळखपत्राबाबत संशय निर्माण झाल्यानंतर त्याची पडताळणी करण्यात आली. त्यानंतर मुंबई पोलिसांनी तातडीने कारवाई करत रोहनला ताब्यात घेतले.

PM Modi: पीएम मोदींच्या दौऱ्यापूर्वी मोठी कारवाई, मुंबई पोलिसांकडून दोघांना अटक
PM Modi Photo Removal Case: मनसेच्या नेत्याला मुंबईतून अटक; राजकीय वर्तुळात खळबळ

रोहनसोबत असलेल्या व्यक्तीची चौकशी केली असता तो त्याचा बॉडीगार्ड असल्याचे सांगण्यात आले. मात्र, या बॉडीगार्डकडे बंदूक आढळून आल्याने प्रकरण अधिक गंभीर झाले. बनावट ओळखपत्र आणि शस्त्र घेऊन अतिसुरक्षित कार्यक्रमस्थळी प्रवेश करण्याचा प्रयत्न नेमका कोणत्या उद्देशाने करण्यात आला याचा तपास सुरू आहे. पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी एसपीजी आणि स्थानिक सुरक्षा यंत्रणांकडून कडक नियम लागू असताना कार्यक्रमस्थळी अशा प्रकारे संशयित व्यक्ती पोहोचल्याने सुरक्षेच्या व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

PM Modi: पीएम मोदींच्या दौऱ्यापूर्वी मोठी कारवाई, मुंबई पोलिसांकडून दोघांना अटक
PM Modi : नरेंद्र मोदींच्या आयुष्यातील ही सर्वात मोठी चूक; संजय राऊतांच्या विधानाने खळबळ, अमित शाहांवर डागली तोफ

या दोघांचा नेमका उद्देश काय होता?

बनावट PMO ओळखपत्र कुठून मिळवले? बंदूक घेऊन कार्यक्रमस्थळी प्रवेश करण्यामागे कोणाचा हात आहे का? या सर्व प्रश्नांची उत्तरे आता तपासातून समोर येणार आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास मुंबई क्राईम ब्रँचकडून सुरू आहे. दोन्ही संशयितांची कसून चौकशी केली जात आहे. पीएम मोदींच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या प्रकारामुळे सुरक्षा यंत्रणांमध्ये सतर्कता वाढवण्यात आली आहे.

PM Modi: पीएम मोदींच्या दौऱ्यापूर्वी मोठी कारवाई, मुंबई पोलिसांकडून दोघांना अटक
Mumbai Water Update: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! पाण्याचं टेन्शन मिटलं! तानसा तलावात ९८.३७ टक्के पाणीसाठा, इतर तलावांमध्ये किती आहे पाणीसाठा?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com