

मुंबई : मुंबईला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या सात प्रमुख तलावांमध्ये सध्या ९५.९७ टक्के पाणीसाठी आहे. रविवार ६ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत तलावांमध्ये एकूण १३,८९,०७५ दशलक्ष लिटर पाणी जमा झाले आहे.
मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाणीसाठा थोडा कमी आहे. २०२५ मध्ये याच दिवशी १४,०५,४३७ दशलक्ष लिटर म्हणजेच ९७.१० टक्के, तर २०२४ मध्ये १४,१९,२७६ दशलक्ष लिटर म्हणजे ९८.०६ टक्के पाणीसाठा होता.
विहार तलाव १०० टक्के भरला असून तेथून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तुलसी तलावात ९६.५९ टक्के, तानसा ९८.३७ टक्के, मध्य वैतरणा ९६.९२ टक्के आणि भातसा तलावात ९६.१० टक्के पाणीसाठा आहे. अप्पर वैतरणा तलावात ९१.५१ टक्के पाणीसाठा असून, सात तलावांमध्ये हा सर्वात कमी आहे.
सध्या अप्पर वैतरणामध्ये २,०७,७६० दशलक्ष लिटर, मोडक सागरमध्ये १,२६,५१० दशलक्ष लिटर, तानसामध्ये १,४२,७१० दशलक्ष लिटर, मध्य वैतरणामध्ये १,८७,५७२ दशलक्ष लिटर, भातसामध्ये ६,८९,०५३ दशलक्ष लिटर, विहारमध्ये २७,६९८ दशलक्ष लिटर आणि तुलसीमध्ये ७,७७१ दशलक्ष लिटर पाणी आहे.
तलावांच्या परिसरात गेल्या २४ तासांत हलका पाऊस झाला. अप्पर वैतरणा येथे २८ मिमी, तानसा येथे १६ मिमी, भातसा येथे १८ मिमी आणि मध्य वैतरणा येथे १२ मिमी पावसाची नोंद झाली.
विहार तलावाचा ओव्हरफ्लो ७ जुलैपासून सुरू आहे. तानसा धरणाचा ओव्हरफ्लो २२ ऑगस्टपर्यंत सुरू होता. त्यानंतर तानसाच्या पाणीसाठ्यात थोडी घट झाली. मध्य वैतरणाचे WSCPO गेट सध्या बंद आहे. तसेच अप्पर वैतरणातून पाण्याचा विसर्ग ६ जुलैपासून बंद आहे. एकूणच, मुंबईच्या सात तलावांमध्ये सध्या पुरेसा पाणीसाठा असला तरी गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदाची पातळी काहीशी कमी आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.