Sakshi Sunil Jadhav
सकाळी कोमट पाण्यात लिंबाचा रस आणि चिमूटभर दालचिनी घेतल्याने पचनाला सुरूवात होण्यास मदत होऊ शकते.
ग्रीन टीमधील अँटिऑक्सिडंट्स आणि पुदिन्यामुळे ताजेतवाने वाटण्यासोबत पचनासही मदत होऊ शकते.
कोमट पाण्यात थोड्या प्रमाणात अॅपल सायडर व्हिनेगर घेतल्याने भूक नियंत्रण आणि पोट फुगणे कमी होण्यास मदत होऊ शकते.
काकडी व आल्याने तयार केलेले इन्फ्यूज्ड वॉटर शरीराला हायड्रेट ठेवण्यास आणि पचनाला मदत करण्यास उपयुक्त ठरू शकते. morning detox drinks
बदामाचे दूध, काही ड्रायफ्रूट्स आणि चिया सीड्स यांचा स्मूदी सकाळची भूक दीर्घकाळ नियंत्रणात ठेवण्यास मदत करू शकतो.
अॅलोवेरा व लिंबाचे मिश्रण पचनाला मदत करण्यासोबत पोट फुगणे आणि शरीरातील अतिरिक्त पाणी कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.
हळदीतील कर्क्युमिनमध्ये दाह कमी करण्यास मदत करणारे गुणधर्म असून सकाळी हे पेय घेणे आरोग्यदायी पर्याय ठरू शकते.
अशा प्रकारची पेये आहाराचा भाग ठरू शकतात, पण फक्पेत यांमुळे महिन्याला ३ किलो वजन कमी होईलच असे नाही; संतुलित आहार आणि व्यायामही आवश्यक आहे.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.