Sakshi Sunil Jadhav
तुमच्या रात्रीच्या चुकीच्या सवयींमुळे तुमची किडनी निकामी होऊ शकते. त्यामुळे वेळीच तुमच्या सवयींमध्ये बदल करणे महत्त्वाचे आहे.
झोपण्याआधी भरपूर पाणी पिणे टाळा. त्याने वारंवार लघवीला उठावे लागू शकते आणि झोपेवर परिणाम होतो.
रात्री लघवी जास्त वेळ रोखून ठेवल्याने मूत्राशयावर ताण आणू शकते आणि संसर्गाचा धोका वाढवू शकतो.
रात्री पाणी पूर्णपणे बंद करणे योग्य नाही. शरीरातील पाण्याची कमतरता झाल्याने लघवी जास्त दाट होऊन किडनी स्टोनचा धोका वाढू शकतो.
झोपण्यापूर्वी मोठ्या प्रमाणात प्रोटीनयुक्त आहार घेतल्याने शरीरातून निर्माण होणारा युरिया फिल्टर करण्यासाठी किडनीवर जास्त भार पडू शकतो.
रात्री उशिरा मद्यपान केल्याने शरीरातले पाण्याचे संतुलन, रक्तदाब आणि झोपेची गुणवत्ता प्रभावित होऊ शकते.
स्लीप अॅपनियाकडे दुर्लक्ष करा. रात्री ऑक्सिजनची पातळी कमी करून रक्तदाब वाढवू शकते आणि किडनीच्या आरोग्यावर परिणाम करू शकते.
दिवसभर पुरेसे पाणी न पिता रात्री एकाच वेळी जास्त पाणी पिणे ही सवय बदलून दिवसभर योग्य प्रमाणात पाणी घ्या.
रात्री वारंवार होणाऱ्या त्रासापासून काही प्रमाणात आराम मिळवण्यास मदत करू शकते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.