Mumbai Water Storage  AI Image
मुंबई/पुणे

Mumbai : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! पाणीपातळी ९५.८९ टक्क्यांवर , सातही धरणांमध्ये किती टक्के पाणीसाठा शिल्लक?

Mumbai Water Storage News : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात प्रमुख तलावांमध्ये १३,८७,८३९ ML म्हणजेच ९५.८९ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. विहार तलाव १०० टक्के भरला असून पाणीपुरवठ्याची चिंता कमी झाली आहे.

Alisha Khedekar

  • मुंबईच्या सात प्रमुख तलावांमध्ये ९५.८९% पाणीसाठा

  • विहार तलावात १००% पाणीसाठा

  • यंदाचा एकूण पाणीसाठा २०२५ पेक्षा अधिक

मुंबई शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या सात प्रमुख तलावांमध्ये यंदा समाधानकारक पाणीसाठा जमा झाला आहे. ५ सप्टेंबर रोजी सातही तलावांमध्ये मिळून १३,८७,८३९ ML पाणीसाठा शिल्लक आहे. या सात जलाशयांची एकूण साठवण क्षमता १४,४७,३६३ ML आहे.

मुंबईच्या भातसा तलावात ६,८८,२२९ ML, म्हणजेच ९५.९८ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. गेल्या २४ तासांत या तलावाच्या पातळीत कोणताही बदल झालेला नाही. तुलनेत २०२५ मध्ये याच दिवशी भातसामध्ये ९२.३१ टक्के, तर २०२४ मध्ये ९७.२८ टक्के साठा होता. मोडक सागरमध्ये ९८.४७ टक्के, तानसामध्ये ९८.२४ टक्के, तर मध्य वैतरणामध्ये ९७.०८ टक्के पाणीसाठा आहे. अप्पर वैतरणामध्ये ९१.०७ टक्के साठा असून, गेल्या २४ तासांत त्याची पातळी ०.०६ मीटरने वाढली आहे.

विहार तलावाने यंदाही आपली १०० टक्के उपयुक्त साठवण क्षमता गाठली आहे. तलावात २७,६९८ ML पाणी असून, गेल्या २४ तासांत पातळीत बदल झालेला नाही. तुलसी तलावात ९६.७९ टक्के साठा असून, त्याची पातळी ०.०१ मीटरने कमी झाली आहे. एकूण साठ्याची तुलना करता, २०२५ मध्ये याच दिवशी सातही तलावांमध्ये १३,८१,४७५ ML, तर २०२४ मध्ये १४,२१,८६६ ML पाणीसाठा होता. यंदाचा साठा गतवर्षीपेक्षा अधिक असला, तरी २०२४ च्या तुलनेत काहीसा कमी आहे.

दरम्यान, जुलै महिन्यात मुसळधार पावसामुळे विहार, तुलसी, तानसा आणि मोडक सागर या तलावांमध्ये पाणी ओसंडून वाहू लागले होते. सध्या मुंबईच्या पाणीपुरवठ्यासाठी उपलब्ध साठा समाधानकारक असल्याने आगामी काळात पाणीपुरवठ्याबाबतची चिंता काही प्रमाणात कमी झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मावळात बेकायदेशीर उत्खनन; तहसील कार्यालयावर तृप्ती देसाईंचे बोंबाबोंब आंदोलन

माळशेज घाटात भीषण अपघात; ST बस आणि आयशर टेम्पोची समोरासमोर धडक; वाहतूक विस्कळीत

Weight Loss Tips: किती पावले चालण्याने आठवड्यात १ किलो वजन कमी होईल?

Gyanesh Kumar : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पद्मभूषण द्या; भाजप नेत्याची मागणी

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींसाठी खुशखबर, अवघ्या काही तासांत खात्यात पैसे जमा होणार, महत्त्वाची अपडेट आली समोर

SCROLL FOR NEXT