PM Modi Photo Removal Case: मनसेच्या नेत्याला मुंबईतून अटक; राजकीय वर्तुळात खळबळ

PM Modi Photo Removal Case: पुण्यातील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो काढल्याप्रकरणी मोठी अपडेट हाती आली आहे. आता मनसेच्या आशिष साबळेला मुंबईतून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आतापर्यंत चार मनसे पदाधिकाऱ्यांना अटक झाली आहे.
PM Modi Photo Removal Case:
Ashish Sable arrested in Mumbai in PM Modi photo casesaam tv
Published On

पुण्यातील शासकीय तंत्रनिकेतन येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र भिंतीवरून काढल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी पुणे शहर पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. या प्रकरणात आता आणखी एक अटक करण्यात आली आहे. मनसेच्या आंदोलनातील आशिष साबळेला मुंबईतून अटक करण्यात आलीय. अटक करण्यात आलेल्या मनसेच्या ४ पदाधिकाऱ्यांची नावे प्रशांत कनोजिया, विक्रांत भिलारी आणि हर्षद गोडसे, आशिष साबळे अशी आहेत.

PM Modi Photo Removal Case:
मनोज जरांगे पाणी प्यायले, पण उपोषणावर ठाम; नेमकी चर्चा काय अन् निर्णय काय झाला?

शासकीय तंत्रनिकेतन, पुणेचे प्राचार्य राजेंद्र काशीराम पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून चतुर्शृंगी पोलिसांनी गुन्हा (FIR) दाखल करण्यात आलाय. त्यानंतर पोलिसांकडून अटकेची कारवाई केली जातेय. या एफआयआर मध्ये अमित ठाकरे यांना आरोपी म्हणून नमूद करण्यात आले आहे. यासह त्यांच्यासोबत असलेल्या 20-25 अज्ञात पदाधिकारी, विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांचाही उल्लेख करण्यात आलाय.

PM Modi Photo Removal Case:
Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंना आणखी धक्के बसणार? 6 नगरसेवक सोडणार ठाकरेंची साथ, बड्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यानुसार अमित ठाकरे आणि त्यांचा गट सोमवारी कोणतीही पूर्वपरवानगी न घेता महाविद्यालयाच्या प्रशासकीय कार्यालयात आले होते. अमित ठाकरे यांनी विद्यार्थ्यांचे वसतिगृह, मेस आणि शौचालयांमधील स्वच्छतेबाबत महाविद्यालयीन प्रशासनाला जाब विचारला. मोठ्या आवाजात सूचना दिल्या, असा आरोप पाटील यांनी करण्यात आलाय.

अमित ठाकरे यांच्यासोबत आलेल्या अज्ञात कार्यकर्त्यांपैकी एकाला कार्यालयाच्या डाव्या बाजूच्या भिंतीवरील पंतप्रधान नरेंद्र मोदींचे छायाचित्र काढण्यास सांगण्यात आले. पाटील यांनी याला विरोध केला असता, त्या कार्यकर्त्यांने ते छायाचित्र "बळजबरीने" काढले. तसेच, हा गट विनाकारण कार्यालयात थांबून राहिला आणि त्यांनी "मनसे जिंदाबाद" व "महाराष्ट्र नवनिर्मित विद्यार्थी सेना विजय असो" अशा घोषणा देऊन गोंधळ घालण्यात आला, असं तक्रारीत म्हटलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com