मनोज जरांगे पाणी प्यायले, पण उपोषणावर ठाम; नेमकी चर्चा काय अन् निर्णय काय झाला?

Manoj Jarange Patil Hunger Strike Latest Update: मनोज जरांगे पाटील यांनी पाणी प्यायले, मात्र उपोषण मागे घेण्यास नकार दिला. प्रसाद लाड यांनी भेट घेत हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्र प्रक्रिया उद्या दुपारी १२ वाजेपर्यंत सुरू करण्याचे आश्वासन दिले.
Manoj Jarange Patil hunger strike latest update
Manoj Jarange Patil hunger strike latest updatesaam tv
Published On

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे गेल्या तीन दिवसांपासून अंतरवालीसराटी येथे उपोषणाला बसले आहे. आज भाजप आमदार प्रसाद लाड यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली. त्यावेळी तुयांनी हैद्राबाद गॅजेटटनुसार कुणबी प्रमाणपत्र देण्याचे काम उद्या 12 वाजेपर्यंत सुरू करणार असून पहिले प्रमाणपत्र मनोज दादांच्या हातातून देणार असल्याची मोठो घोषणा त्यांनी केली. तसेच मंत्रालयात मराठा कक्ष स्थापन करणार असल्याचे आश्वासन ही लाड यांनी दिले.

आंतरवालीसराटी येथे मोठ्या प्रमाणात मराठा समाज एकवटला असून राज्यात देखील आज मराठा बांधव हा आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी बोलताना प्रसाद लाड म्हणाले, दादा मी विनंती करायला आलो आहे. मी पहिल्या दिवसांपासून् आपल्याला सांगतोय उपोषण करू नका. तुमच्या मनात जे आहे तेच होणार आहे. तुमचा विषय सोडवण्यासाठी आम्ही आहोत. काल रात्रीपासून मला देखील झोप लागली नाही. माझ्या डोळ्यात अश्रु आहेत. मी आज तुमचा भाऊ म्हणून आलोय. जरांगेंना साथ देण्यासाठी आलो आहे. त्यांच्या 15 मागण्याची उत्तर पाठवली होती. दादांना प्रशासनासोबत बोलायचे नव्हते, त्यांच्या मोठ्या भावाच्या रूपाने आलो आहे.

प्रसाद लाड यांनी पुढे बोलताना सांगितले की, राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये संबंधित नोंदी लावण्यात येणार आहेत. तसेच जिल्हानिहाय पेनड्राईव्ह देण्यात आले आहेत. आपण ६ कोटी मराठे आहोत, त्यामुळे आपली संख्या कमी नाही. अर्जदारांनी केवळ अर्ज करणे आवश्यक आहे. अर्जच केला नाही, तर प्रमाणपत्र मिळणार कसे? असा सवाल त्यांनी केला.

Manoj Jarange Patil hunger strike latest update
जरांगे पाटलांचा सरकारला थेट अल्टिमेटम! 'या' १३ मागण्यांसाठी अंतरवाली सराटीत रणांगण, पाहा संपूर्ण यादी

प्रत्येक जिल्ह्यासाठी नोडल ऑफिसरची नियुक्ती करण्यात आली असून, मंत्रालयातही स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात येत आहे. हैदराबाद गॅझेटनुसार प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया उद्या दुपारी १२ वाजेपर्यंत सुरू करण्यात येईल. पहिले प्रमाणपत्र दादांच्या हस्ते देण्यात येणार आहे. शिंदे-फडणवीस सरकार दादांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे, असेही प्रसाद लाड यांनी स्पष्ट केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com