38 जिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या; मुख्यमंत्र्यांनी जारी केला आदेश; प्रशासनात खळबळ

List Of New District Magistrates In UP 2026: उत्तर प्रदेशात योगी सरकारने मोठा प्रशासकीय फेरबदल केला असून ३८ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.
UP Chief Minister orders major IAS reshuffle, 38 officers transferred across key districts
UP Chief Minister orders major IAS reshuffle, 38 officers transferred across key districtssaam tv
Published On

उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारने प्रशासकीय पातळीवर मोठा फेरबदल केला असून एकूण तब्बल ३८ आयएएस (IAS) अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये गाजलेले अधिकारी रिंकू सिंह राही यांच्यासह ८ जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांचा (DM) समावेश आहे.

UP Chief Minister orders major IAS reshuffle, 38 officers transferred across key districts
BJP Worker Killed: भाजप कार्यकर्त्याची निर्घृण हत्या, विजय मिरवणुकीत रक्तरंजित थरार

रिंकू सिंह राही यांची नवी नियुक्ती

गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले आयएएस अधिकारी रिंकू सिंह राही यांची जालौन येथे संयुक्त दंडाधिकारी (Joint Magistrate) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राही यांनी आपल्याला काम दिले जात नसल्याचा आरोप करत राजीनामा दिला होता, मात्र आता त्यांना फील्ड पोस्टिंग देण्यात आली आहे.

UP Chief Minister orders major IAS reshuffle, 38 officers transferred across key districts
Uttarakhand Tunnel Crash News Updates | अखेर 41 मजुरांची सुखरूप सुटका

८ जिल्ह्यांना मिळाले नवीन जिल्हाधिकारी (DM)

योगी सरकारने खालील जिल्ह्यांमध्ये नवीन जिल्हाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत:

मधुसूदन हुल्गी, विशेष सचिव (मुख्यमंत्री) / अपर आवास आयुक्त यांची देवरिया जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

सॅम्युअल पाल एन, व्यवस्थापकीय संचालक (केस्को) / अपर आयुक्त (राज्य कर) यांची जौनपूर जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

अनंत वर्धन, उपाध्यक्ष (गोरखपूर विकास प्राधिकरण) यांना मऊ जिल्हाधिकारी पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

गौरव सिंह सोगरवाल, नगर आयुक्त (गोरखपूर) यांची महाराजगंज जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

संतोष कुमार शर्मा, जिल्हाधिकारी (महाराजगंज) यांची फिरोजाबाद जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे.

राजेंद्र पेंसिया, जिल्हाधिकारी (संभल) यांची मुरादाबाद जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे.

अंकित खंडेलवाल, नगर आयुक्त (आग्रा) यांची संभल जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

अभिषेक पांडेय, अपर भूमि व्यवस्था आयुक्त यांची प्रतापगढ जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

शिव सहाय अवस्थी, जिल्हाधिकारी (प्रतापगढ) यांची मुख्य कार्यपालक अधिकारी, उत्तर प्रदेश ग्रामीण रस्ते विकास प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

अर्जुन सिंह, जिल्हाधिकारी (बुलंदशहर) यांची विशेष सचिव (मुख्यमंत्री) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com