कॅबिनेटमध्ये होणार फेरबदल; मुख्यमंत्री राज्यपालांची भेट घेणार, या नव्या चेहऱ्यांना मिळणार संधी

Yogi Adityanath Meeting Governor Anandiben Patel Update: उत्तरप्रदेशमध्ये मंत्रिमंडळ फेरबदलाची शक्यता वाढली असून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज राज्यपालांची भेट घेणार आहेत. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
UP Chief Minister Yogi Adityanath likely to meet Governor Anandiben Patel amid cabinet reshuffle buzz in Lucknow.
UP Chief Minister Yogi Adityanath likely to meet Governor Anandiben Patel amid cabinet reshuffle buzz in Lucknow.saam tv
Published On

उत्तरप्रदेशमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला असून बिहारमध्ये सम्राट चौधरी यांच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर भाजपनं आपलं लक्ष आता उत्तरप्रदेशमध्ये केंद्रीत केल्याचे पाहायला मिळत आहे. पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीआधी राज्यात मंत्रिमंडळ विस्तार होणार असून आज मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे राज्यपाल आनंदीबेन पटेल यांची भेट घेणार आहे. सूत्रांनी दिलेल्या महितीनुसार आज संध्याकाळी ते लोकभवन येथे जातील आणि कॅबिनेटमध्ये फेरबदल करण्याबाबत चर्चा करतील.

UP Chief Minister Yogi Adityanath likely to meet Governor Anandiben Patel amid cabinet reshuffle buzz in Lucknow.
Thalapathy Vijay CM oath : राजकारणात नवा ट्विस्ट! थलापती विजय यांचा शपथविधी रखडला; 'मॅजिक फिगर'साठी अजून २ आमदारांच्या पाठिंब्याची गरज

या चेहऱ्यांना मिळू शकते मंत्रिमंडळामध्ये संधी

आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजप सामाजिक आणि जातीय संतुलन राखण्याची तयारी करत असल्याचे मानले जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंत्रिमंडळात दोन ब्राम्हण नेत्यांचा समावेश केला जाऊ शकतो. तसेच दोन ओबीसी नेत्यांचीही मंत्रिपदीवर्णी लागू शकते. एक दलित आणि एका महिलेला देखील मांत्रिमंडळात शामील करू शकते. सर्व जाती धर्मातील नेत्यांना मंत्रिपद देऊन आगामी निवडणुकीच्याआधी योगी सरकार वोट बँक मजबूत करत आहे.

लखनऊमध्ये भाजपची राज्यस्तरीय बैठक

मंत्रिमंडळ विस्तारासह पक्ष संघटनेबाबत भाजप सज्ज झाली असून 11 आणि 12 मे रोजी लखनऊमध्ये एक मोठी बैठक घेण्याची शक्यता आहे. या सभेला राज्यातील सर्व 98 जिल्हयांचे अध्यक्ष उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत आगामी निवडणुकीची रणनीती, संघटना मजबूत करणे आणि निवडणूक प्रचारावर चर्चा होणार आहे. तसेच भाजप महिलांमध्ये आपली पकड मजबूत करण्यावरही विशेष लक्ष देत आहे. अलीकडेच पक्षाने 'नारी शक्ति वंदन' अभियान सुरू केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com