Plane Crash in US : अमेरिकेत दिसलं रहस्यमय विमान, हवाई दलाच्या जेटने पाठलाग केल्यानंतर कोसळलं; 4 जणांचा मृत्यू

America plane Crased : अमेरिकेच्या हवाई दलाच्या F-16 फायटर जेटने या विमानाचा पाठलाग केला.
Plane
Plane Saam TV
Published On: 

Plane Crash in US : अमेरिकेच्या व्हर्जिनियामध्ये रहस्यमय विमानाने उड्डाण करताना दिसल्याने एकच खळबळ उडाली आहे. राजधानी वॉशिंग्टन डीसीच्या आकाशात हे रहस्यमय विमान उडत होते. हा परिसर संवेदनशील असल्याने तातडीने अमेरिकेच्या हवाई दलाच्या F-16 फायटर जेटने या विमानाचा पाठलाग केला. त्यानंतर हे विमान क्रॅश झालं आहे.

दरम्यान या रहस्यमय विमानाच्या पायलटशी संपर्क साधण्याचाही प्रयत्न करण्यात आला. परंतु विमानातील पायलटने काहीच प्रतिसाद दिला नाही. अखेरीस हे विमान वॉशिंग्टन डीसीजवळ व्हर्जिनियाच्या जंगलात कोसळले. या अपघातात विमानातील चारही जणांचा मृत्यू झाला. (Latest Marathi News)

Plane
Kolkata Airport News : बॉम्ब.. बॉम्ब... विमानात तरुणाची आरडाओरड; कोलकाता विमानतळावर सुरक्षा यंत्रणांची पळापळ

अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या रहस्यमय विमानाने एलिझाबेथटाऊन, टेनेसी येथून उड्डाण केले होते आणि ते मॅकआर्थर विमानतळाकडे जात होते.

Plane
Train Accident Update: ओडिशा ट्रेन अपघाताच्या प्राथमिक चौकशीत धक्कादायक खुलासा, सीबीआयकडे पुढील तपासाची जबाबदारी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेसना ५६० नावाचे हे नागरी विमान होते. अपघातापूर्वी 315 मैलांचा प्रवास करणाऱ्या विमानात चार जण होते अशीही माहिती समोर येत आहे.

विमान कोसळल्यानंतर सुमारे चार तासांनंतर बचाव कर्मचारी पायीच अपघातस्थळी पोहोचले. आता सुरक्षा यंत्रणा याबाबत अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.