Odisha Train Accident
Odisha Train AccidentSaam Tv

Train Accident Update: ओडिशा ट्रेन अपघाताच्या प्राथमिक चौकशीत धक्कादायक खुलासा, सीबीआयकडे पुढील तपासाची जबाबदारी

Train Accident News: ट्रॅकच्या इंटरलॉकिंग सिस्टीममध्ये जाणीवपूर्वक छेडछाड केल्याचे पुरावे रेल्वेला प्राथमिक तपासात मिळाले आहेत.
Published on

Odisha Train Accident :  ओडिशामधील बालासोर येथील तीन ट्रेनचा अपघात घातपात तर नव्हता ना असा संशय व्यक्त केला जात आहे. कारण ट्रॅकच्या इंटरलॉकिंग सिस्टीममध्ये जाणीवपूर्वक छेडछाड केल्याचे पुरावे रेल्वेला प्राथमिक तपासात मिळाले आहेत. त्यामुळे आता या अपघाताची सीबीआयमार्फत चौकशी करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे.

रेल्वे अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, रेल्वेची इंटरलॉकिंग सिस्टीम अत्यंत सुरक्षित असून त्यात त्रुटी राहण्यास फारसा वाव नसतो. प्राथमिक तपासात असं समोर आलं आहे की, इंटरलॉकिंग सिस्टीममध्ये जाणीवपूर्वक छेडछाड केल्याशिवाय बदलता येत नाही. (Latest Marathi News)

Odisha Train Accident
Odisha train Accident : काळजाच्या तुकड्यासाठी अ‍ॅम्बुलन्ससह 230 किमी अंतर कापून बालासोर गाठलं; मुलाला शवागारात पाहिलं अन्...

रेल्वे अधिकाऱ्यांच्या या खुलाशांमुळे बालासोर दुर्घटना हा अपघात नसून कट आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. अपघाताचा तपास घातपाताच्या दिशेनेही केला जात आहे असं अधिकाऱ्यांनी सांगितले. अधिकाऱ्यांनी सांगितले की इंटरलॉकिंग सिस्टममध्ये मानवी हस्तक्षेपामागील हेतू शोधण्यासाठी सीबीआय चौकशी केली जात आहे. (Train Accident)

Odisha Train Accident
Odisha Balasore Train Accident: ...अन् अश्विनी वैष्णव यांना अश्रू अनावर; म्हणाले 'आमची जबाबदारी अद्याप संपलेली नाही...'

अपघाताता 275 प्रवाशांचा मृत्यू

ओडिशा सरकारने जारी केलेल्या आकडेवारीनुसार 275 लोकांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. काही मृतदेहांची दोनदा मोजणी करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.

या आकडेवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितले की, त्यांच्या राज्यातील 61 लोकांचा अपघातात मृत्यू झाला असून 182 लोक अद्याप बेपत्ता आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com