Modi's Reaction On Budget : अर्थसंकल्पावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले; 'गरिबांचे स्वप्न...'

India Budget 2023 : हे गरीबांचे स्वप्न पुर्ण करणारे बजेट असल्याची प्रतिक्रिया PM नरेंद्र मोदींनी दिली आहे.
narendra modi
narendra modi Saam Tv
Published On

PM Narendra Modi On Union Budget 2023: केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये त्यांनी शेतकरी आणि सामान्यांना दिलासा देणाऱ्या अनेक महत्वाच्या घोषणा केल्या. २०२४ च्या निवडणुकीपुर्वी मोदी सरकारकडून हे शेवटचे अर्थसंकल्प असेल. या बजेटवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे.

narendra modi
Budget Update 2023: पॅनकार्डबाबत निर्मला सितारामन यांची मोठी घोषणा, म्हणाल्या; 'आता सर्व...'

अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अर्थमंत्री निर्मला सितारामन (Nirmla Sitharaman) तसेच त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक केले. त्याचबरोबर हे गरीबांचे स्वप्न पुर्ण करणारे बजेट असून यामध्ये वंचितांना प्राधान्य देण्यात आले आहे असेही ते म्हणाले.

काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी..

आजच्या अर्थसंकल्पाबद्दल बोलताना, "शेतकऱ्यांना सक्षम बनवणारा अर्थसंकल्प असून या अर्थसंकल्पामुळे ग्रामीण शहरी अर्थव्यवस्थेतील दरी कमी होईल तसेच यामुळे कोट्यवधी लोकांचे स्वप्न पुर्ण करणारे हे बजेट आहे. त्याचबरोबर हरित ऊर्जा, हरित पायाभूत सुविधा आणि हरित नोकऱ्यांना यामुळे प्रोत्साहन मिळेल," अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कौतुक केले.

narendra modi
New Income Tax Slab Budget 2023 : मोदी सरकारचं मध्यमवर्गीयांना मोठं 'गिफ्ट'; ७ लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त

त्याचबरोबर, "सरकारने मध्यमवर्गीयांचं सक्षमीकरण करण्यासाठी आणि राहणीमान सुलभ करण्यासाठी पावलं उचलली आहेत, या अर्थसंकल्पात तंत्रज्ञान आणि नवीन अर्थव्यवस्थेवर लक्ष केंद्रीत गेले असून आम्ही टॅक्सचे दर कमी करत दिलासा दिला आहे," असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. (Narendra Modi)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com