Accident Video: भरधाव कारने १० ते १२ जणांना उडवलं; महिलेचा जागीच मृत्यू, थरारक घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

Delhi Car Accident News: भरधाव कार अनियंत्रित होऊन थेट आठवडी बाजारात घुसली. काही क्षणातच कारने १० ते १२ जणांना जोरदार धडक दिली. या घटनेत एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून ७ ते ८ जण जखमी झाले आहेत.
Delhi Car Accident Video
Delhi Car Accident VideoANI

Delhi Car Accident Viral Video

भरधाव कार अनियंत्रित होऊन थेट आठवडी बाजारात घुसली. काही क्षणातच कारने १० ते १२ जणांना जोरदार धडक दिली. या घटनेत एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून ७ ते ८ जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. अंगाचा थरकाप उडवणारी ही घटना दिल्लीतील गाझीपूर भागात बुधवारी (ता. १३) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Delhi Car Accident Video
Uddhav Thackeray: भाजपच्या दुसऱ्या यादीत नितीन गडकरींना उमेदवारी; उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया...

काळजाचा ठोका चुकविणाऱ्या या घटनेचं CCTV फुटेज समोर आलं आहे. सीता देवी (वय २२, रा. हयात नगर, खोडा कॉलनी, गाझियाबाद) असे मृत महिलेचे नाव आहे. या घटनेत कारचालक देखील जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

दिल्लीतील गाझीपूर भागात प्रत्येक बुधवारी आठवडी बाजार भरतो. त्यामुळे बाजारात खरेदी करण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. बुधवारी रात्री आठवडी बाजार भरलेला असताना, अचानक एक कार अनियंत्रित होऊन बाजारात घुसली. काही क्षणातच कारने १० ते १२ जणांना चिरडलं.

अपघात इतका भीषण होता, की कार थेट एका दुकानात शिरली. या घटनेत कारखाली आल्याने एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर ६ ते ७ जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये ५ महिला आणि २ पुरुषांचा समावेश आहे. अपघातानंतर परिसरातील नागरिक चांगलेच संतापले होते.

त्यांनी चालकाला चोप देत कारची तोडफोड केली. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. सध्या अपघातातील जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. या थरारक घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com