Uddhav Thackeray: भाजपच्या दुसऱ्या यादीत नितीन गडकरींना उमेदवारी; उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया...

Uddhav Thackeray on Nitin Gadkari: भाजपने जाहीर केलेल्या लोकसभेच्या पहिल्या यादीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच नाव नव्हतं. यावरून उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली होती.
 Uddhav Thackeray on Nitin Gadkari
Uddhav Thackeray on Nitin GadkariSaam TV
Published On

Uddhav Thackeray Latest Speech

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने ७२ जागांसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत महाराष्ट्रातील २० उमेदवारांचा समावेश आहे. पहिल्या यादीत नाव नसलेल्या नितीन गडकरींना दुसऱ्या यादीत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. गडकरींना लोकसभेची उमेदवारी मिळताच ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

 Uddhav Thackeray on Nitin Gadkari
Vasant More: मनसेला सोडचिठ्ठी देताच वसंत मोरेंना सर्वच पक्षांकडून ऑफर; नेमकं कुणासोबत जाणार? थेट सांगूनच टाकलं...

काही दिवसांपूर्वी भाजपने लोकसभेच्या ९५ जागांसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. या यादीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं नाव नव्हतं. यावरून उद्धव ठाकरे यांनी (Uddhav Thackeray) भाजपवर जोरदार टीका केली होती. इतकंच नाही, तर ठाकरेंनी गडकरींनी महाविकास आघाडीत येण्याची दोन वेळा ऑफर दिली होती.

भाजपला लाथ मारून नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी महाविकास आघाडीत यावं, निवडून आणण्याची जबाबदारी आमची, असं ठाकरेंनी जाहीर सभेत म्हटलं होतं. आमचं सरकार लवकरच सत्तेत येणार असून तुम्हाला मोठं मंत्रीपद देऊ, असंही ठाकरे म्हणाले होते.

दुसरीकडे, उद्धव ठाकरे यांनी केलेलं विधान बालिश आणि हास्यास्पद असल्याचं म्हणत नितीन गडकरी यांनी ऑफर नाकारली होती. दरम्यान, आता भाजपने जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत नितीन गडकरी यांना नागपुरातून लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. गडकरींना उमेदवारी मिळताच ठाकरेंनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. (Latest Marathi News)

गडकरींच्या उमेदवारीवर ठाकरेंची प्रतिक्रिया

उद्धव ठाकरे सध्या जनसंवाद दौऱ्यावर असून ते महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघात वादळी सभा घेत आहेत. बुधवारी (ता. १३) ठाकरेंनी वाशिम येथे जाहीर सभा घेतली. या सभेतून त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. "सुरुवातीला देशात भाजपचे फक्त दोन खासदार होते. त्यावेळी लालकृष्ण आडवाणी, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्यासह नितीन गडकरींनी पक्षाचा विस्तार केला".

"मात्र, आज भाजपला निष्ठावंत नेत्यांचा विसर पडला असून दुसऱ्या यादीत गडकरींना लोकसभेचं तिकीट देण्यात आलं. बरं झालं आज तरी "गंगेत घोडं न्हालं", असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपसह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर बोचरी टीका केली.

 Uddhav Thackeray on Nitin Gadkari
Mahayuti Seat Sharing: मित्रपक्षाच्या दबावामुळे भाजप बॅकफुटवर? अखेर शिंदे गट अन् राष्ट्रवादीला इतक्या जागा मिळणार!

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com