ठाकरे म्हणतात, मोदी गद्दारांचे नवे स्वामी, मोदींचा कोर्टावर दबाव, राऊतांचा आरोप

Thackeray vs Modi: सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष-चिन्हाची सुनावणी सुरु असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी फुटीर खासदारांसह पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतलीय..मात्र या भेटीवरून ठाकरेसेनेनं आता आक्रमक पवित्रा घेतलाय.. उद्धव ठाकरेंनी मोदींवर टीका करताना काय विधान केलयं...पाहूयात या रिपोर्टमधून...
Uddhav Thackeray criticizes PM Narendra Modi after Shinde MPs meeting during Supreme Court hearing
Uddhav Thackeray criticizes PM Narendra Modi after Shinde MPs meeting during Supreme Court hearingsaam tv
Published On

सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी सुरु असताना दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी 6 फुटीर खासदारांसह पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली...मात्र याचं भेटीवरून आता नवा वाद पेटलाय...पंतप्रधांनाना विद्यार्थ्यांना भेटायला वेळ नाही, मात्र गद्दारांना ते लगेच भेटतात, अशी टीका उद्धव ठाकरेंनी मोदींवर केलीय... तसचं फुटीर खासदारांना मोदींनी मी तुमच्या पाठिशी आहे, असं आश्वासन दिल्याचाही आरोप करत मोदी गद्दारांचे नवे स्वामी असल्याची खरमरीत टीकाही ठाकरेंनी मोदींवर केलीय..

दुसरीकडे फुटीर खासदारांची भेट घेऊन पंतप्रधान मोदी न्यायालयावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप राऊतांनी केलाय. त्याला भाजपानं प्रत्युत्तर दिलयं....सुप्रीम कोर्टात शिवसेनेच्या वादावर सुनावणी सुरू आहे. आणि त्याच दरम्यान एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान मोदी यांची बंददाराआड भेट झाल्यामुळे आता यावरून उलटसुलट चर्चा सुरू झालीय. ठाकरेसेनेनं या भेटीवर थेट आरोप केल्यामुळे न्यायालयाच्या निकालाबाबत आणखीनच उत्सुकता वाढलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com