मेवाडला सुरतशी थेट आणि अधिक चांगली रेल्वे कनेक्टीव्हिटी देण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. उदयपूर-असरवा वंदे भारत एक्स्प्रेसचा सूरतपर्यंत विस्तार 3 ऑक्टोबरपासून नियमितपणे सुरू होणार आहे. या विस्ताराबाबत अनिश्चितता निर्माण झाल्यानंतर रेल्वे मंत्रालयाकडून नव्याने प्रयत्न करण्यात आले. त्यानंतर 3 ऑक्टोबरपासून ही ट्रेन पटरीवर धावणार आहे. ही ट्रेन मंगळवार वगळता सहा दिवस धावणार आहे.
2 ऑक्टोबरला संध्याकाळी 5.30 वाजता वंदे भारत एक्सप्रेस उदयपूरमध्ये दाखल होईल. त्यानंतर ट्रेनचा मुक्काम उदयपूरमध्ये दाखल होईल. त्यानंतर ट्रेनचा मुक्काम उदयपपूरमध्येच राहणार आहे. 3 ऑक्टोबर रोजी पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार ही ट्रेन उदयपूरहून सुरतच्या दिशेने रवाना होईल. ट्रेन उदयपूरमध्ये दाखल होताना भव्य स्वागत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
नव्या वेळापत्रकानुसार वंदे भारत एक्सप्रेस उदयपूरहून दुपारी 3.35 वाजता रवाना होईल. त्यानंतर सायंकाळी 4.03 वाजता जावर, 4.50 वाजता डुंगरपूर, 5.27 वाजता शामलाजी रोड, 6.18 वाजता हिम्मतनगर आणि 7.25 वाजता असरवा येथे पोहोचेल. असरवा येथून ट्रेन रात्री 8.58 वाजता मणिनगर, 9.50 वाजता आणंद आणि 10.22 वाजता भरूच येथे पोहोचेल. त्यानंतर रात्री 11 वाजता ट्रेन सुरतला दाखल होईल. परतीच्या प्रवासात वंदे भारत एक्सप्रेस सुरतहून सकाळी 6.10 वाजता रवाना होऊन दुपारी 1.40 वाजता उदयपूरला पोहोचेल. त्यामुळे मेवाड आणि सुरतदरम्यान प्रवाशांना थेट वंदे भारत रेल्वे सेवा उपलब्ध होणार आहे.
वंदे भारत एक्सप्रेसचा सुरतपर्यंत विस्तार झाल्यामुळे व्यापार आणि रोजगाराच्या कारणासाठी सुरत तसेच दक्षिण भारतात जाणाऱ्या प्रवाशांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. सध्या अनेक प्रवाशांना उदयपूरहून बसने सुरत गाठल्यानंतर पुढील रेल्वे प्रवास करावा लागतो. बस आणि रेल्वेच्या वेळापत्रकात योग्य समन्वय नसणे, तसेच अनेक रेल्वे गाड्यांमध्ये प्रतीक्षा यादी असणे, यामुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागतो. आता उदयपूर ते सुरत थेट वंदे भारत सेवा उपलब्ध झाल्यामुळे प्रवाशांना अधिक सोयीची कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. सुरतहून दक्षिण भारताच्या दिशेने पुढील रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठीही कनेक्टिव्हिटी वाढणार असल्याने मेवाडमधील प्रवाशांना व्यापार, रोजगार आणि इतर महत्त्वाच्या प्रवासासाठी अधिक चांगली रेल्वे सुविधा मिळण्याची अपेक्षा आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.