गणेशोत्सवात कोकणवासीयांना सर्वात मोठं गिफ्ट! मुंबईहून धावणार नवीन ट्रेन;'या' २५ स्टेशनवर थांबणार एक्सप्रेस

Mumbai Sawantwadi train Update : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणवासीयांसाठी मोठी खुशखबर! मुंबई CSMT ते सावंतवाडी रोड दरम्यान नवीन दैनंदिन एक्सप्रेस सुरू झाली. २५ महत्त्वाच्या स्थानकांवर या ट्रेनचे थांबे असतील.
CSMT Sawantwadi Express
CSMT Sawantwadi Express
Published On

CSMT Sawantwadi Express : गणेशोत्सवाच्या तोंडावर कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. कोकणातील प्रवाशांची वर्षांनुवर्षांची मागणी अखेर पूर्ण झाली आहे. मध्य रेल्वेकडून मुंबई ते सावंतवाडी रोड दरम्यान नवीन 'दैनंदिन' एक्सप्रेस ट्रेन सुरू करण्यात आली आहे. या नवीन रेल्वे सेवेचा शुभारंभ देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथून मुख्यमंत्र्यांसह केंद्रीय रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सावंतवाडीसाठी एक्सप्रेस सुरू झाली.

या नवीन ट्रेनमुळे दादर आणि एलटीटी स्थानकांवर होणारी तुफान गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक रहिवासी, व्यापारी तसेच पर्यटकांना मोठा दिलासा मिळणार आहे. ही ट्रेन दादर, ठाणे, पनवेल, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली आणि कुडाळसह तब्बल २५ महत्त्वाच्या स्थानकांवर थांबणार आहे.

CSMT Sawantwadi Express
महाराष्ट्रातील 'या' बड्या नेत्याची उपपंतप्रधानपदी वर्णी? संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ

कोकण भागातील प्रवाशांची दीर्घकाळापासूनची मागणी पूर्ण करण्यासाठी मध्य रेल्वे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई आणि सावंतवाडी रोड दरम्यान दैनंदिन एक्सप्रेस गाडी सुरू झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योग मंत्री पीयूष गोयल,रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव,यांच्या उपस्थितीत आज दुपारी १२.५० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - सावंतवाडी रोड दैनंदिन एक्सप्रेस सुरू झाली. या कार्यक्रमाला एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, राहुल नार्वेकर, नितेश राणे, रितू तावडे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.

CSMT Sawantwadi Express
Pune Traffic : पुण्याच्या वाहतुकीत मोठे बदल, २ दिवस हे रस्ते राहणार बंद, पर्यायी मार्ग कोणते? यादी एका क्लिकवर

कोणत्या स्थानकावर थांबणार एक्सप्रेस ?

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दुपारी १२.५० वाजता हिरवा झेंडा दाखवला. ही गाडी दुसऱ्या दिवशी मध्यरात्री ०२.०० वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचेल. ही गाडी दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ या स्थानकांवर थांबेल.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - सावंतवाडी रोड दैनंदिन एक्सप्रेसचे फायदे काय?

कणकवली, कुडाळ, सावंतवाडी आणि आसपासच्या भागातील रहिवाशांसाठी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून एक समर्पित दैनंदिन गाडी उपलब्ध होईल.

नियमित दैनंदिन सेवेचा फायदा व्यापारी आणि पर्यटकांना होईल.

सावंतवाडी, आंबोली, तारकर्ली आणि गोवा सीमा पर्यटन क्षेत्रासह दक्षिण कोकणातील पर्यटनाला मोठी चालना मिळेल.

ही गाडी रात्रीचा प्रवास घडवून आणेल आणि तिच्या आगमनाच्या व सुटण्याच्या वेळा सोयीच्या असतील.

लोकमान्य टिळक टर्मिनस आणि दादर येथून कोकणाकडे जाणाऱ्या इतर गाड्यांवरील गर्दी कमी करण्यास मदत होईल.

CSMT Sawantwadi Express
पुणेकरांनो रात्री १२ नंतर रिक्षाने प्रवास करताय? नव्या भाडेवाढीचा आकडा पाहून उडेल झोप; पाहा नवे दर

या गाडीच्या नियमित सेवेबाबतचा तपशील नंतर कळवला जाईल

मध्य रेल्वे कोकण क्षेत्रातील रेल्वे कनेक्टिव्हिटी मजबूत करण्यासाठी आणि प्रवाशांना सुरक्षित, आरामदायक व किफायतशीर प्रवास उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि सावंतवाडी रोड दरम्यान सुरू होणारी ही नवीन दैनंदिन सेवा या दिशेने टाकलेले एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. यामुळे कोकण पट्ट्यातील सामाजिक-आर्थिक विकास आणि पर्यटनाला चालना मिळेल, तसेच महाराष्ट्रातील जनतेच्या अपेक्षांची पूर्तता होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com