Underwater Road Cum Rail Tunnel: नदीच्या पोटातून प्रवास! भारताचा पहिला अंडरवॉटर रेल्वे आणि रोड टनल; कुठे अन् कधी होणार सुरू?
Summary -
भारतातील पहिला अंडरवॉटर रोड-कम-रेल टनल लवकरच सुरू होणार
आसाममध्ये बांधला जाणार हा नवीन टनल
ब्रह्मपुत्रा नदीखाली १५.७९ किमी लांबीचा ट्विन ट्यूब बोगदा तयार होणार
प्रवासाचा वेळ कमी होऊन लॉजिस्टिक्स खर्चात मोठी बचत होणार
भारतामधील अनेक राज्यात विकासकामं मोठ्या वेगाने होत आहेत. शहरांच्या सुधारणा करण्यासाठी आणि जनतेला चांगल्या सुखसुविधा मिळाव्यात यासाठी नवनवीन प्रोजेक्टची कामं सुरू आहेत. आता लवकरच भारतीयांना एक अद्भूत अनुभव घ्यायला मिळणार आहे. भारतात 'अंडरवॉटर रोड कम रेल टनल'तयार होणार आहे. या टनलद्वारे नदीच्या खालून एकाच वेळी रेल्वे आणि वाहनं धावणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये या प्रोजेक्टला मंजुरी देण्यात आली.
या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये राष्ट्रीय महामार्ग-१५ वरील गोहपूर ते नुमालीगडपर्यंत ७१५ विभागात ४-लेन प्रवेश-नियंत्रित ग्रीनफील्ड कनेक्टिव्हिटी बांधण्यास मान्यता देण्यात आली. यामध्ये ब्रह्मपुत्र नदीखाली १५.७९ किमीचा रस्ता-कम-रेल्वे बोगदा याचा समावेश आहे. हा बोगदा आसाममध्ये इंजीनिअरिंग प्रोक्योरमेंट कंस्ट्रक्शन (EPC) आधारावर बांधला जाईल. या प्रोजेक्टचा एकूण खर्च १८,६६२ कोटी रुपये इतका आहे. सध्या, राष्ट्रीय महामार्ग-७१५ वरील नुमालीगड आणि राष्ट्रीय महामार्ग-१५ वरील गोहपूर यांच्यातील अंतर २४० किमी आहे. नुमालीगड, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आणि विश्वनाथ शहर यामधून जाण्यासाठी ६ तास लागतात.
ब्रह्मपुत्रा नदीखाली रस्ता आणि रेल्वे बोगदा बांधला जाणार आहे. या आव्हानांना तोंड देण्यासाठी, हा प्रोजेक्ट राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १५ वरील गोहपूर ते नुमालीगड पर्यंत ४-लेन प्रवेश-नियंत्रित ग्रीनफील्ड कनेक्टिव्हिटी म्हणून विकसित करण्याचा प्रस्ताव आहे. यामध्ये ब्रह्मपुत्र नदीखाली एक ट्विन-ट्यूब रोड-कम-रेल्वे बोगदा समाविष्ट आहे. हा भारतातील पहिला आणि जगातील दुसरा पाण्याखालील रोड-कम-रेल्वे बोगदा असणार आहे. या प्रोजेक्टमुळे आसाम, अरुणाचल प्रदेश, नागालँड आणि इतर ईशान्येकडील राज्यांना मोठा फायदा होईल. यामुळे मालवाहतुकीची कार्यक्षमता वाढेल, लॉजिस्टिक्स खर्च कमी होईल आणि या प्रदेशात सामाजिक-आर्थिक विकासाला चालना मिळेल.
येथे दोन प्रमुख राष्ट्रीय महामार्ग तसेच दोन प्रमुख रेल्वे मार्गांचा संगम होईल. हा प्रोजेक्ट दोन प्रमुख राष्ट्रीय महामार्ग, नॅशनल हायवे १५ आणि नॅशनल हायवे ७१५ तसेच दोन रेल्वे मार्गांना जोडणार आहे. हा प्रोजेक्ट राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या (NFR) रंगिया विभागाअंतर्गत गोहपूर बाजूला रंगिया-मुकोंगसेलेक रेल्वे विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या (NFR) तिनसुकिया विभागाअंतर्गत नुमालीगड बाजूला फुरकाटिंग-मारियानी लूप लाइन विभागाला जोडेल. हा प्रोजेक्ट आसाममधील प्रमुख आर्थिक, सामाजिक आणि लॉजिस्टिक्स नोड्सना उत्कृष्ट कनेक्टिव्हिटी देईल.
याव्यतिरिक्त हा प्रोजेक्ट ११ आर्थिक नोड्स, तीन सामाजिक नोड्स, दोन पर्यटन नोड्स आणि आठ लॉजिस्टिक्स नोड्सना जोडून मल्टी-मॉडल इंटिग्रेशन वाढवेल. ज्यामुळे चार प्रमुख रेल्वे स्थानके, दोन विमानतळ आणि दोन अंतर्देशीय जलमार्गांशी वाढीव कनेक्टिव्हिटी देईल. यामुळे या भागातील नागरिकांचा प्रवास सुसाट आणि कमी वेळात होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

