
मध्य प्रदेशमध्ये भीषण रस्ते अपघाताची घटना घडली आहे. मध्य प्रदेशच्या सिधी जिल्ह्यामध्ये रविवारी रात्री उशिरा मिनी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. राष्ट्रीय महामार्ग- ३९ वरील सिद्धी कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील उपनी गावानजीक हा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये ८ जणांचा जागीच मृत्यू झाला तर १४ जण गंभीर जखमी झाले आहेत.
मुलाच्या मुंडन समारंभासाठी सर्व नातेवाईक मिनी बसने जात असताना अपघात झाला. मटिहानी गावातील २२ जण एका मिनी बसमधून प्रवास करत होते. मंदिरामध्ये पोहचण्यापूर्वीच वाटेमध्ये भरधाव ट्रकने मिनी बसला समोरून जोरदार धडक दिली. मध्यरात्री आडीचच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातामध्ये मिनी बसच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला आहे.
या अपघातामध्ये ७ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर एकाचा रुग्णालयामध्ये पोहचण्यापूर्वी मृत्यू झाला. या अपघातामध्ये १४ जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये अनेकांची प्रकृती गंभीर आहे. मृत्यू झालेले सर्वजण साहू कुटुंबातील आहेत. हे सर्वजण बहरीतील देवरी आणि पंडारिया या गावातील रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे. मृतांमध्ये ५ महिला आणि ३ पुरूषांचा समावेश आहे. या घटनेनंतर साहू कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि युद्धपातळीवर मदतकार्य करत जखमींना तात्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. ज्यांची प्रकृती गंभीर होती त्यांना पुढील उपचारासाठी रेवा मेडिकल कॉलेजमध्ये हलवण्यात आले आहे. अतिवेग आणि निष्काळजीपणामुळे हा अपघात झाला असल्याची माहिती समोर आली आहे. या अपघाताचा तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.