
संभाजीनगरमध्ये भीषण अपघाताची घटना घडली आहे. ऊसाचा ट्रक उलटून अपघात झाला. या अपघातामध्ये ट्रकखाली १७ मजूर दबले गेले. या भीषण अपघातामध्ये चौघांचा जागीच मृत्यू झाला तर १३ जण जखमी झाले आहेत. कन्नडच्या पिशोरजवळ ऊसाच्या ट्रकला अपघात झाला. ट्रकवर १७ मजूर बसून प्रवास करत होते. ट्रक अचानक उलटला आणि त्याखाली सर्व मजूर दबले गेले. चौघांचा जागीच मृत्यू झाला तर इतर जण जखमी झाले. घटनास्थळावर बचावकार्य सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संभाजीनगरच्या कन्नडमधील पिशोर खांडीत ऊसाच्या ट्रकला अपघात झाला. मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. ट्रकमध्ये असलेल्या ऊसावर बसून १७ कामगार प्रवास करत होते. अचानक पिशोर खांडीत ट्रक उलटला आणि ऊसाखाली १७ कामगार दबले गेले. या १७ कामगारांपैकी ४ जणांचा जागीच मृत्यू झाला तर १३ जण जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच कन्नड शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचावकार्य करत १३ मजूरांचे प्राण वाचवण्यात आले. घटनास्थळी मदत कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. जखमी झालेल्या कामगारांना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले आहे. जखमींमधील अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. हा अपघात नेमका कसा झाला याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.