Ranveer Allahbadia: हाय कोर्टात माफी मागितल्यानंतरही रणवीर अल्लाहबादियाला आसाम पोलिसांनी केली अटक? व्हिडीओ व्हायरल

Ranveer Allahbadia : सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर रणवीरला त्याचा पॉडकास्ट शो सुरू करण्याची परवानगी मिळाली. पण अलिकडेच समोर आलेल्या व्हिडिओमध्ये तो गुवाहाटीमध्ये आसाम पोलिसांसोबत दिसत आहे.
Ranveer Allahbadia
Ranveer Allahbadia Criedsaamtv
Published On

Ranveer Allahbadia : 'इंडियाज गॉट लेटेंट' या यूट्यूब शो दरम्यान अश्लील कमेंट करणाऱ्या रणवीर अलाहाबादियाचे प्रकरण अद्याप शांत झालेले नाही. अलिकडेच, बातम्या आल्या की त्याने त्याच्या टिप्पणीबद्दल न्यायालयात माफी मागितली आहे आणि सर्व कायदेशीर औपचारिकता पूर्ण केल्यानंतर तो त्याच्या शो पुन्हा सुरु करण्याची तयारी करत आहे.

पण आसाममधून समोर आलेल्या एका व्हिडिओमध्ये रणवीर अलाहाबादिया पुन्हा एकदा पोलिसांच्या ताब्यात दिसत आहे. खरंतर, अलीकडेच रणवीर गुवाहाटीमध्ये आसाम पोलिसांसमोर हजर झाला, ज्याची एक क्लिप आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये, पोलिस युट्यूबरचा हात धरून त्याला घेऊन जात असल्याचे दिसून येते.

Ranveer Allahbadia
Ata Thambaycha Naay : खास महिला दिनानिमित्त; प्रेरणादायी सत्यकथेवर आधारित 'आता थांबायचं नाय!' चित्रपटाचा टिझर प्रदर्शित

गुवाहाटी गुन्हे शाखा चौकशी करणार

शोमध्ये केलेल्या टिप्पणीनंतर रणवीर अलाहाबादियाविरुद्ध अनेक एफआयआर दाखल करण्यात आले. रणवीरला गेल्या आठवड्यात आसाम पोलिसांसमोर हजर व्हावे लागले होते आणि हा व्हिडिओ त्याच्याशी संबंधित आहे. त्याच्याविरुद्ध गुवाहाटीमध्येही गुन्हा दाखल करण्यात आला होता, त्यानंतर आसाम पोलिसांनी त्याला समन्स पाठवले होते. यापूर्वी आशिष चंचलानी यांनाही गुवाहाटीत चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. गुन्हे शाखेच्या कार्यालयात गेल्यानंतर, आशिषची अनेक तास चौकशी करण्यात आली. तथापि, या प्रकरणाचा तपास कुठपर्यंत पोहोचला आहे याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

Ranveer Allahbadia
Chandika: स्त्री शक्तीचा जागर ! जागतिक महिला दिनानिमित्ताने 'चंडिका' चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित

न्यायाधीश काय म्हणाले?

रणवीर अलाहाबादिया यांच्या याचिकेवर सुनावणी करताना, न्यायमूर्ती सूर्यकांत आणि एन कोटीश्वर सिंह यांच्या खंडपीठाने हा खटला हाताळला. रणवीर अलाहाबादिया यांच्या विधानावर नाराजी व्यक्त करत न्यायालयाने कडक टिप्पणी केली होती. न्यायालयाने त्याचे मन घाणेरडे आहे म्ह्णून असे भाष्य करण्याचे धाडस त्याने केले अशी टिप्पणी रणवीरवर केली. अशा व्यक्तीचे युक्तिवाद आपण का ऐकावे? न्यायालयाने म्हटले आहे की, 'ज्या विकृत मानसिकतेचे प्रदर्शन केले गेले आहे त्याची संपूर्ण समाजाला लाज वाटेल.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com