Bus Accident : प्रवासी गाढ झोपेत घडले भयानक; बस थांबताच काही क्षणात जळून खाक

Shahapur News : बस शहापूर तालुक्यातील चेरपोली घाट पार करून वर चढली असताना आटगाव जवळ बस आली असता बसमधून अचानक धूर निघू लागला धूर निघत असल्याचे चालकाच्या लक्षात आले बस रस्त्याच्या बाजूला घेत थांबविली
Bus Accident
Bus AccidentSaam tv
Published On

फैय्याज शेख 
शहापूर
: मुंबई- नाशिक महामार्गावर शहापूर येथील आटगावजवळ रात्रीच्या सुमारास थरारक घटना घडली आहे. यात खासगी बसमधून प्रवाशी जात असताना बसने अचानक पेट घेतला. काही क्षणात बस पूर्णपणे जळून खाक झाली होती. तर बसच्या आगीमुळे बाजूला असलेल्या जंगलाला देखील आग लागली होती. सुदैवाने प्रवाशी थोडक्यात बचावले होते. 

रात्रीच्या सुमारास दादर- शिर्डी बस ही दादरहून शिर्डीच्या दिशेने मार्गस्थ झाली होती. रात्रीची वेळ असल्याने बसमधील जवळपास सर्वच प्रवाशी झोपलेले होते. बस शहापूर तालुक्यातील चेरपोली घाट पार करून वर चढली असताना आटगाव जवळ बस आली असता बसमधून अचानक धूर निघू लागला होता. धूर निघत असल्याचे चालकाच्या लक्षात आले. यानंतर चालकाने लागलीच बस रस्त्याच्या बाजूला घेत थांबविली.  

Bus Accident
Satara Accident : कार अनियंत्रित होऊन बंद कंटेनरवर धडकली; दोन महिलांचा मृत्यू, दोनजण गंभीर

प्रवासी होते गाढ झोपेत 

रात्र असल्याने बसमधील सर्व प्रवासी गाढ झोपेत होते. चालकाने प्रसंगावधान राखत बस महामार्गाच्या कडेला उभी करून प्रवाशांना जागे केले. यानंतर प्रवाशांना बाहेर उतरण्यास सांगितले. लागलीच सर्व प्रवासी बाहेर पडले. यानंतर काही क्षणात बसने पेट घेतला. चालकाच्या प्रसंग सावधान मुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान प्रवाशांमध्ये घबराट पसरली होती. 

Bus Accident
Strawberry Farming : सातपुड्यात बहरली स्ट्रॉबेरी शेती; आदिवासी शेतकऱ्यांनी पिकविली उत्तम दर्जाची स्ट्रॉबेरी

जंगलालाही लागली आग 

बसला लागलेल्या आगीमुळे बाजूला असलेल्या जंगलाला देखील आग लागली होती. बस जळत असल्याची माहिती खर्डी पोलिस स्टेशनचे पोलिस कर्मचारी भाऊसाहेब मुंडे यांना मिळाली, यानंतर त्यांनी तत्काळ शहापूर नगरपंचायतची अग्निशमन दलाला माहिती दिली. यानंतर अग्निशनम दलाची गाडी घटनास्थळी बोलवून बसला लागलेली आग विझविण्यात आली. मात्र यात बस संपूर्णपणे जळून खाक झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com