मातृदिनी भयंकर घडलं; मुलाच्या डोळ्यादेखत आईचा मृत्यू

Indore Road accident news : इंदूरमध्ये मातृदिनी भयंकर घडलं. मुलाच्या डोळ्यादेखत आईचा अपघाती मृत्यू झाला.
Indore Road accident
Indore Road accident news Saam tv
Published On
Summary

मातृ दिनी आईचा अपघाती मृत्यू झालाय

मुलासमोर आईचा अपघाती मृत्यू

पाण्याच्या टँकरने दुचाकीला धडक दिल्याने घडला अपघात

मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये घडला अपघात

Indore Road accident : मध्य प्रदेशच्या इंदूर जिल्ह्यात मातृ दिनी भयंकर घटना घडली आहे. मातृदिनी मुलासमोर आईचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली. मुलासोबत कामाला जाताना अर्चना यांचा मृत्यू झाला. रस्त्यावर दुचाकीने जाताना पाण्याच्या टँकरने दुचाकीला धडक दिली. अपघातात अर्चना यांना गंभीर दुखापत झाली. रुग्णालयात दाखल करताना त्यांचा रस्त्यात मृत्यू झाला.

Indore Road accident
उल्हासनगरमध्ये महापालिकेचा ‘हातोडा’; तब्बल २७ अवैध गाळे केले जमीनदोस्त, कारवाईने व्यापाऱ्यांमध्ये खळबळ

टीव्ही नाईनच्या वृत्तानुसार, इंदूरच्या खजराना पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणाऱ्या अर्चना शंकुतला रुग्णालयात काम करत होत्या. त्या रविवारी सकाळी मुलासोबत दुचाकीने कामाला निघाल्या होत्या. मुलाची दुचाकी बंगाली चौकाजवळ पोहोचली. त्यानंतर एका पाण्याच्या टँकरने दुचाकीला धडक दिली. या धडकेत दुचाकीवरून अर्चना थेट रस्त्यावर पडल्या. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

अपघातानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केलं. परंतु डॉक्टरांनी मृत घोषित केलं. मातृ दिनी आईच्या मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे. या अपघात प्रकरणी पोलिसांनी मुलाच्या तक्रारीवरून पाण्याच्या टँकर चालकाच्या विरोधात तक्रार दाखल करून ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी पाण्याच्या टँकर देखील ताब्यात घेतला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला आहे.

Indore Road accident
Shocking : नागपूर हादरले! माय लेकीची राहत्या घरात आत्महत्या; तपासात धक्कादायक कारण समोर

मातृदिनी आईच्या मृत्यूने मुलाला मोठा धक्का बसला आहे. घटनेने मुलाच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. अर्चना राहत असलेल्या परिसरात शोककळा पसरली आहे. पोलिसांनी एफआयआर नोंदवून कारवाईला सुरुवात केली आहे. तसेच चालकाला ताब्यात घेऊन पुढील कारवाईस सुरुवात केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com