उल्हासनगरमध्ये महापालिकेचा ‘हातोडा’; तब्बल २७ अवैध गाळे केले जमीनदोस्त, कारवाईने व्यापाऱ्यांमध्ये खळबळ

ulhasnagar news update : उल्हासनगरमध्ये महापालिकेने अवैध बांधकामाावर हातोडा चालवला आहे. तब्बल २७ अवैध गाळे जमीनदोस्त केले.
ulhasnagar news
ulhasnagar Saam tv
Published On
Summary

बदलापूरनंतर उल्हासनगरमध्ये अवैध बांधकामांविरोधात कारवाईचा धडाका

पालिकेकडून २७ अनधिकृत गाळे जमीनदोस्त

नोटिशीनंतर दखल न घेतल्याने अतिक्रमण विभागाकडून कारवाई

बदलापुरात काही महिन्यांपूर्वी अवैध बांधकामांविरोधात कारवाईचा धडाका लावला होता. त्यानंतर आता उल्हासनगरमध्येही कारवाईचा धडाका लावण्यात आला आहे. उल्हासनगर महापालिकेने शहरातील अवैध बांधकामांविरोधात मोठी कारवाई केली. उल्हासनगरमध्ये कॅम्प नंबर ३ मधील रेजन्सी प्लाझा येथील २७ अनधिकृत गाळे जमीनदोस्त केले. कारणे दाखवा नोटीस बजावूनही संबंधित विकासकाने कोणतीही दखल न घेतल्याने अतिक्रमण विभागाने ही धडक मोहीम राबवली.

ulhasnagar news
West Bengal : पश्चिम बंगालमध्ये खुनी सत्र सुरु, मुख्यमंत्र्यांच्या PA नंतर TMC नेत्याची हत्या

उल्हासनगरमधील शांतीनगर परिसरातील रेजन्सी प्लाझा ‘बी’ विंगमध्ये संपूर्ण मजला बेकायदा उभारण्यात आल्याच्या तक्रारी महापालिकेकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर आयुक्त मनिषा आव्हाळे यांच्या आदेशानुसार सहाय्यक आयुक्त अजय साबळे आणि अतिक्रमण विभाग प्रमुख गणेश शिंपी यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी दुपारी पाडकाम करण्यात आले.

या कारवाईमुळे अवैध बांधकामधारकांचे धाबे दणाणले असले, तरी शेजारील ‘स्काय डोम’ हॉलमधील साडेतीन हजार चौरस मीटर वाढीव बांधकामावर अंतिम कारवाई कधी होणार, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे. तसेच स्पेक्ट्रम रेसिडेन्सी प्रकरणामुळेही भविष्यात घर खरेदीदारांची फसवणूक होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

ulhasnagar news
महाराष्ट्रातील 2 बँकांवर RBI ची दंडात्मक कारवाई, पुसद अर्बन बँकेवरील निर्बंध वाढले

धुळ्यात अतिक्रमणावर महापालिकेचा हातोडा

काही दिवसांपूर्वी धुळ्यातील देवपूर परिसरातील सुशी नाला लगत असलेल्या अतिक्रमणावर महापालिकेने हातोडा चालवलाय. धुळे महानगरपालिका महसूल विभाग, पाटबंधारे विभागाच्या संयुक्तपणे सुशी नाल्यालगत असलेल्या जवळपास 200 अतिक्रमण केलेल्या घरांवर कारवाई करण्यात येत आहे. शहरात टप्प्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे. कारवाईच्या पहिल्या टप्प्यात आज रविवारी तीसहून अधिक अतिक्रमण केलेल्या घरांवर महापालिकेच्या वतीने हातोडा चालवण्यात आला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com