Shocking: औरंगाबादमध्ये ५ मैत्रिणींनी एकत्र विष प्यायलं, चौघींचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?

Bihar Shocking News: बिहारच्या औरंगाबादमध्ये भयंकर घटना घडली. ५ मैत्रिणींनी सामूहिक आत्महत्याचा प्रयत्न केला. या पाचही जणीने विष घेतलं. यामध्ये चौघींचा मृत्यू झाला तर एकीची प्रकृती गंभीर आहे.
Shocking: औरंगाबादमध्ये ५ मैत्रिणींनी एकत्र विष प्यायलं, चौघींचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
Bihar Shocking NewsSaam Tv
Published On

Summary -

  • औरंगाबाद जिल्ह्यात ५ मैत्रिणींनी सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न केला

  • चार अल्पवयीन मुलींचा जागीच मृत्यू

  • एका मुलीची प्रकृती गंभीर असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू

  • पोलिसांकडून प्रकरणाचा तपास सुरू

बिहारच्या औरंगाबादमधून एक मन हेलावून टाकणारी घटना घडली. या ठिकाणी ५ मैत्रिणींनी एकत्र विषारी पदार्थ खाल्ला. या घटनेत ४ मुलींचा जागीच मृत्यू झाला. तर एका मुलीची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या हृदयद्रावक आणि रहस्यमय घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. ही घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. याचा खुलासा आता झाला असून पोलिस सध्या तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबाद जिल्ह्यातील हसपुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सैदपुर मोती बिगहा गावात ही घटना घडली. या गावामध्ये राहणाऱ्या ५ अल्पवयीन मुलींनी टोकाचे पाऊल उचलले. या ५ मैत्रिणींनी दोन दिवसांपूर्वी एकत्र विषारी पदार्थ खाल्ला. या घटनेत चौघींचा मृत्यू झाला तर एकीची प्रकृती गंभीर आहे. तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या मुलीने मैत्रिणींसोबत विषारी पदार्थ खाल्ल्यानंतर घरी धाव घेत कुटुंबीयांना सांगितले. त्यांनी तिला तात्काळ रुग्णालयात दाखल केले.

तर, विषारी पदार्थ खाल्ल्यानंतर चौघीजणी रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात गेल्या. त्याठिकाणीच त्यांचा तडफडून मृत्यू झाला. या संपूर्ण घटनेनंतर मृत मुलींच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. एकाच ठिकाणी या चौघींच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. या मुलींनी आत्महत्या का केली यामागचे कारण अद्याप समोर आले नाही. पण या घटनेमुळे बिहारमध्ये खळबळ उडाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com