Walmik Karad: संतोष देशमुख हत्या प्रकरण; औरंगाबाद खंडपीठानं फेटाळला वाल्मीक कराडचा जामीन अर्ज

Beed Santosh Deshmukh Death Case: मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने वाल्मीक कराडचा जामीन अर्ज फेटाळलाय. न्यायमूर्ती सुशील घोडेस्वार यांनी बुधवारी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला.
Beed Santosh Deshmukh Death Case
Aurangabad bench of the Bombay High Court while hearing the Santosh Deshmukh murder case.Saam tv
Published On
Summary
  • संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडला मोठा धक्का.

  • औरंगाबाद खंडपीठाने कराडचा जामीन अर्ज फेटाळला.

  • न्यायालयाने तातडीचा दिलासा देण्यास स्पष्ट नकार दिला.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख खून खटल्यातील मुख्य आरोपी वाल्मीक कराडला मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने मोठा धक्का दिलाय. यालयाने कराडचा जामीन अर्ज फेटाळून लावलाय. न्यायमूर्ती सुशील घोडेस्वार यांनी बुधवारी हा महत्त्वपूर्ण निकाल दिलाय. दरम्यान बीडच्या सत्र न्यायालयाने जामीन नाकारल्यानंतर वाल्मीक कराड यांनी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती.

Beed Santosh Deshmukh Death Case
Maharashtra Politics: पिंपरी चिंचवडमध्ये अजितदादांनी खेळला डाव, भाजपसह ठाकरे गटाला 'दे धक्का, ८ जणांनी हाती बांधलं घड्याळ

सुनावणी गेल्या काही दिवसांपासून अत्यंत चुरशीची ठरली होती. शुक्रवारी ज्येष्ठ विधिज्ञ शिरीष गुप्ते यांनी कराडच्या वतीने तब्बल सहा तास प्रदीर्घ युक्तिवाद केला होता. त्यांनी पोलिसांच्या तपासावर आणि अटकेच्या कायदेशीर प्रक्रियेवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. मात्र मंगळवारी झालेल्या सुनावणीत सरकार पक्षातर्फे मुख्य सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे आणि फिर्यादी पक्षातर्फे ॲड. नितीन गवारे यांनी आरोपींचे मुद्दे खोडून काढले.

Beed Santosh Deshmukh Death Case
Beed Crime: कराड गँगची जिल्हा कारागृहात दादागिरी; पोलीस कर्मचाऱ्याला जीवे मारण्याची धमकी

सुनावणीवेळी आरोपीचे वकील यांनी सदर गुन्हयातील तपासाबाबत काही आक्षेप नोंदविले. त्यांनी न्यायालयास विनंती केली की, सदर प्रकरणाची दोष निश्चिती १९ डिसेंबरला असून, त्यांच्या दोष मुक्तीचा अर्ज उच्च न्यायालयात सुनावणीसाठी प्रलंबित आहे. तोपर्यंत कराड यांच्या दोष निश्चितीला स्थगिती देण्याचे आदेश बीडच्या विशेष न्यायालयाला द्यावेत, अशीही विनंती आरोपीच्या वकिलांनी केली.

मात्र मुख्य सरकारी वकील आणि फिर्यादीचे वकील ॲड. नितीन गवारे यांनी सरकारची बाजू भक्कमपणे मांडली. त्यांनी पुराव्यांच्या आधारे आरोपीचे सर्व दावे खोडून काढले. 'मकोका' अंतर्गत झालेली कारवाई योग्य असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com