Beed Crime: कराड गँगची जिल्हा कारागृहात दादागिरी; पोलीस कर्मचाऱ्याला जीवे मारण्याची धमकी

Beed Crime News: संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपीने बीड जिल्हा कारागृहातील कर्मचाऱ्याला धमकी दिलीय. यामुळे कराड टोळीची कारागृहात दादागिरी करत असल्याचा प्रकार समोर आलाय.
Walmik Karad News Update
Beed District Jail where Karad gang accused allegedly threatened a prison staff member.Saam tv
Published On
Summary
  • कराड गँगची बीड जिल्हा कारागृहात दादागिरी

  • संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींकडून कर्मचाऱ्याला जीवे मारण्याची धमकी.

  • बाबा कवठे नावाच्या कारागृह कर्मचाऱ्याला धमकी दिल्याचा दावा.

योगेश काशिद, साम प्रतिनिधी

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींचा माज काही कमी होताना दिसत नाहीये. देशमुख हत्या प्रकरणातील आरोपीने जिल्हा कारागृहात कर्मचाऱ्याला जीवे मारण्याची धमकी दिलीय. बाबा कवठे असं या कर्मचाऱ्याचे नाव आहे. बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी सध्याला बीड जिल्ह्यातील कारागृहात आहेत.

देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींनी जिल्हा कारागृहातील बाबा कवठे नावाच्या कर्मचाऱ्याला जीवे मारण्याची धमकी दिलीय. कराड गँगची जिल्हा कारागृहात दादागिरी चालू आहे. यापरकरणी बीडचे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख स्वप्निल गलधर यांची फेसबुक पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होतेय.

Walmik Karad News Update
ब्रेकअप होताच बॉयफ्रेंडची सटकली; गर्लफ्रेंडच्या घरात जाऊन गोळ्या झाडल्या

दरम्यान जुलै महिन्यातही कराड गँगमधील एका गुंडाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यात आमदारांना शिवीगाळ आणि धमक्या दिल्या होत्या. वाल्मीक कराड जेलमध्ये असला तरी त्याच्या गुन्हेगारी गँगचे दहशत माजवणं सुरूच आहे. कराडचा जवळचा सहकारी संदीप तांदळे याने राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड, बीडचे आमदार सुरेश धस आणि बाळा बांगर यांच्याविरोधात अश्लील भाषेत शिवीगाळ केली होती.

Walmik Karad News Update
Crime News: धक्कादायक ! जीवन विमा काढून जीव घेतला, पहिला हप्ता भरल्यानंतर बहिणीनं बॉयफ्रेंडला दिली सुपारी

वाल्मीक कराड तुरुंगातून बाहेर येणार? कथित कॉल रेकॉर्डिंगनं उडवली खळबळ

वाल्मीक कराड लवकरच तुरुंगातून बाहेर येणार असल्याची चर्चा सुरू झालीय. या प्रकरणी आमदार धनंजय मुंडे यांच्या एका निकटवर्तीय व्यक्तीचा कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली होती, त्यात हा दावा करण्यात आला होता. व्हायरल झालेली कॉल रेकॉर्डिंग ही परळीतील माजी नगराध्यक्ष आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय बाजीराव धर्माधिकारी यांची होती.

वाल्मीक कराडच्या विरोधात सोशल मीडियावर पोस्ट केल्यानं एका तरुणाला कराडच्या समर्थकांनी मारहाण केली होती. या तरुणाने त्याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली. परंतु तक्रार दाखल केल्यानंतरही पोलिसांनी गुन्हा दाखल केला नसल्याचा प्रकार काही महिन्यांपूर्वी घडला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com