राजस्थानच्या बीकानेरमध्ये सोमवारी एका भीषण अपघातात हरियाणातील एकाच परिवारातील 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोन वर्षाची चिमुकली ही गंभीर जखमी झालीय. हा अपघात राष्ट्रीय राजमार्ग 11 हेमासर फांटे जवळ असलेल्या सिजराल हॉटेलजवळ दुपारी दोन वाजता घडला असून एक कार आणि टेम्पोची समोरासमोर जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की कारचा पूर्ण चुराडा झाला आणि आत बसलेले सर्वजण अडकून पडले. माहिती मिळताच अॅम्ब्युलन्स आणि बचावकार्य घटनास्थळी दाखल झाली.स्थानिक नागरिक आणि पोलिसांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, कारमध्ये एकूण 7 जण प्रवास करत होते. हे सर्वजण हरियाणातील फतेहाबाद जिल्ह्यातील असून एकाच कुटुंबातील होते. बीकानेर जिल्ह्यातील मुकाम येथे बिश्नोई समाजाचे आराध्यदैवत गुरु जम्भेश्वर भगवान यांच्या समाधीचे दर्शन करून परतत असताना हा दुर्दैवी अपघात घडला.
या अपघातात तीन पुरुष, एक महिला, एक लहान मुलगी आणि एका मुलाचा मृत्यू झाला. सुरुवातीला 5 जणांचा घटनास्थळी मृत्यू झाला होता, तर गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केलेल्या एका मुलाने उपचारादरम्यान प्राण सोडले. दोन वर्षांची तनवी ही चिमुकली गंभीर जखमी असून तिला प्राथमिक उपचारानंतर बीकानेर ट्रॉमा सेंटरमध्ये हलवण्यात आले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये ओमप्रकाश (50), पत्नी सोरमा देवी (45) आणि त्यांची मुलगी प्रमिला (3), तसेच रोनित (4), यशवी (10) आणि खुशी (8) यांचा समावेश आहे. तनवी (2) ही गंभीर जखमी असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.