Wife Ends life : पतीच्या मृत्यूनंतर विरह सहन झाला नाही; १० तासानंतर बायकोने आयुष्य संपवलं, दीड वर्षांचा चिमुकला झाला पोरका

Wife Ends life after husband death : पतीच्या मृत्यूनंतर विरह सहन न झाल्याने पत्नीने आयुष्य संपवल्याची घटना घडली आहे. दोघांच्या मृत्यूने दीड वर्षांचा मुलगा पोरका झाला आहे.
Wife Ends life in Marathi
Wife Ends lifeSaam tv
Published On

उत्तर प्रदेशच्या फिरोजाबादमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. फिरोजाबादमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून आजारी असलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यानंतर काही तासांनंतर मृत व्यक्तीच्या पत्नीने आयुष्य संपवल्याची घटना घडली आहे. सकाळी घराबाहेर कोणी न आल्याने नातेवाईकांनी संशय व्यक्त केला. नातेवाईकांनी खिडकी उघडल्यानंतर महिलेचा मृतदेह आढळला. तसेच घरात महिलेची दीड वर्षाची मुलगी रडताना दिसली. या धक्कादायक प्रकारानंतर नातेवाईकांनी पोलिसांना ही माहिती दिली.

फिरोजाबादमधील झलकारी नगरमधील २३ वर्षीय रीनाचा पती रुपेशचा मूत्रपिंड आणि यकृत निकामी झाल्याने गुरुवारी दुपारी मृत्यू झाला. त्यानंतर सायंकाळी महिलेच्या पतीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पतीच्या मृत्यूचा पत्नीला विरह सहन झाला नाही. पतीच्या मृत्यूनंतर काही तासांनी पत्नीने आयुष्य संपवलं.

Wife Ends life in Marathi
Husband-Wife Relations : संमतीशिवाय पत्नीसोबत अनैसर्गिक शरीरसंबंध गुन्हा नाही; हायकोर्टाचा निर्णय, पत्नीचा झाला होता मृत्यू

महिला मृत्यूआधी तिच्या दीड वर्षांच्या मुलाला जवळ घेऊन खूप रडली. त्यानंतर तिने आयुष्य संपवलं. महिलेच्या नातेवाईकांनी घरात मृतदेह लटकलेल्या अवस्थेत पाहिला. त्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. शुक्रवारी सकाळी पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.

Wife Ends life in Marathi
Husband Wife Clash: नवऱ्याचा भयानक प्रकार! चवताळून घेतला पत्नीच्या ओठांचा चावा, महिलेला पडले १६ टाके

पोलिसांकडून तपास सुरु

रुपेशचे वडील महापालिकेत सफाई कर्मचारी पदावर कार्यरत आहेत. त्यांचं अडीच वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. पोलीस कर्मचारी राजेश पांडेय यांनी मृतदेहाचं शवविच्छेदन झाल्याची माहिती दिली. पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरु केला आहे.

Wife Ends life in Marathi
Husband Wife: स्त्रिया नवऱ्याला 'अहो' का म्हणतात? हे कारण माहितीये का?

पतीच्या मृत्यूनंतर १० तासांनी पत्नीने दिला जीव

पतीच्या मृत्यूनंतर पत्नीला विरह सहन झाला नाही. पतीच्या मृत्यूनंतर पत्नी रडून रडून व्याकूळ झाली. पतीच्या मृत्यूनंतर पत्नीने आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. पतीच्या मृत्यूनंतर १० तासांनी पत्नीने आयुष्य संपवलं. दोघांचं दोन वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. त्यांना दीड वर्षांचा चिमुकला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com