VIDEO Viral: परदेशी मुलीचा बॉलिवूड गाण्यावर सूपर डान्स, बघणाऱ्यांकडून टाळ्या-शिट्ट्या वाजवून दाद

सिम्बा चित्रपटातील 'आंख मारे' या गाण्याच्या रिमेकच्या तालावर या मुली नाचत आहेत.
Viral
ViralSaam Tv

Viral Video : सोशल मीडियामुळे लोकाना आपलं टॅलेंट दाखवण्याचं हक्काचं व्यासपीठ मिळालं आहे. मात्र कधीकधी सहज शूट केलेले व्हिडीओही मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. असाच डान्स व्हिडिओ समोर आला आहे. एका परदेशी पर्यटकाचा हा व्हिडीओ आहे, जो बॉलिवूड गाण्यांवर आपली डान्स कला दाखवत आहे.

गाणं समजत नसलं तरी गाण्याची बीट समोरच्याला नाचण्यास भाग पाडतात. बॉलिवूड गाण्यांवर एका परदेशी तरुणीने नेपाळमधील एका दुकानासमोर डान्स केला, तो व्हिडीओ व्हायरल झाला आहे. मुलीची ही मस्त स्टाईल लोकांना आवडत आहे.

Viral
Viral Video : विषारी साप आणि पाळीव कुत्र्याची जीवघेणी झुंज; व्हिडिओ पाहणाऱ्यांच्या काळजाचा उडतोय थरकाप

'आंख मारे...' गाण्यावर डान्स

व्हायरल होत असलेला व्हिडिओ नेपाळमधील आहे. बॉलीवूडची गाणी शेजारच्या देशातही खूप पसंत केली जातात. येथे एका महिला पर्यटकाने आपल्या अप्रतिम डान्स लोकांची मने जिंकली. व्हिडीओमध्‍ये दिसत आहे की, महिला पर्यटक नाचत आहे आणि लोक तिच्या डान्स मूव्‍हने इतके प्रभावित झाले आहेत की सर्वजण शिट्ट्या-टाळ्या वाजवू लागले. परदेशी पर्यटकासोबत एक स्थानिक महिलाही नाचताना दिसत आहे.

Viral
VIRAL VIDEO : मध्य रात्री सुरक्षा रक्षकाचा भूताशी संवाद ? काळजात धडकी भरवणारा व्हिडिओ व्हायरल

सिम्बा चित्रपटातील 'आंख मारे' या गाण्याच्या रिमेकच्या तालावर या मुली नाचत आहेत. टिकटॉक नेपाळी नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओला सुमारे 40 हजार लाइक्स आणि 6 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com