VIRAL VIDEO : मध्य रात्री सुरक्षा रक्षकाचा भूताशी संवाद ? काळजात धडकी भरवणारा व्हिडिओ व्हायरल

थोड्यावेळाने सुरक्षा रक्षक एका व्यक्तीबरोबर बोलताना आणि रजिस्टरमध्ये एन्ट्री करताना दिसला.
VIRAL VIDEO
VIRAL VIDEO Saam tv

VIRAL VIDEO : भूत, प्रेत अशा अनेक गोष्टी या जगात आहेत की नाही यावर प्रत्येकाचे वेगवेगळे मत आहे. अनेक जण भूताच्या अस्तीत्वावर विश्वास ठेवत नाहीत. मात्र अर्जेंटिनायेथील एका हॉस्पिटसलमधून काळजाचा थरकाप उडवणारी दृश्ये समोर आली आहेत. सोशल मीडियावर हॉस्पिटलमधील भयानक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. भूत पेशंट या नावाने व्हिडिओ नेटकऱ्यांचे लक्ष वेधत आहे.

ब्युनोस आयर्समध्ये फिनोचियाटो सॅनेटोरियम हे रुग्णालय (Hospital) आहे. व्हायर होत असलेला व्हिडीओ याच रुग्णालयातील आहे. या रुग्णालयात मध्य रात्री एक असामान्य घटना घडली. रुग्णालयाचे मुख्य द्वार अपोआप उघडले. दार उडल्याबरोबर उपस्थित सुरक्षा रक्षक उठून उभा राहीला.

थोड्यावेळाने सुरक्षा रक्षक एका व्यक्तीबरोबर बोलताना आणि रजिस्टरमध्ये एन्ट्री करताना दिसला. सुरक्षा रक्षक ज्या व्यक्तीशी बोलत आहे ती व्यक्ती मात्र दिसत नाही. त्यामुळे सर्वजण तिथे भूत असल्याचे म्हणत आहेत. एकून ३८ सेकंदांचा हा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. व्हिडिओ पाहून भल्याभल्यांची बोलती बंद झाली आहे.

VIRAL VIDEO
Kantara Movie Controversy | कांतारा चित्रपटातील 'भूत कोला प्रथा' नक्की आहे तरी काय ? पाहा व्हिडीओ

अदृश्य व्यक्तीबरोबर बोलून झाल्यावर सुरक्षा रक्षक त्या व्यक्तीला आतमध्ये जाण्यासाठी लाईन डिव्हाइडर मागे करून परवानगी देतो. आता सोशल मीडियावर या व्हिडिओची चांगलीच चर्चा रंगली आहे. काही व्यक्ती सुरक्षा रक्षकाच्या डोक्यावर कसला तरी परिणाम झाला असावा असं म्हणत आहेत. तर काही याला भूतबाधा असल्याचे म्हणत आहेत. एका वृत्तसंस्थेने या विषयी दिलेल्या माहितीनुसार सदर रुग्णालयात एक दिवस आधीच एका रुग्णाचा मृत्यू झाला होता.

तर या हॉस्पिटलचे प्रवक्ते सदर व्हिडिओाबाबत मत व्यक्त करत म्हटले की, काल रात्री हा दरवाजा अनेक वेळा उघडत होता. सुरक्षारक्षक एन्ट्री करत असला तरी रजिस्टरमध्ये कुणाच्याच नावाची एन्ट्री नाही. या व्हिडिओवर युजर्सने वेगवेगळ्या कमेंट केल्या आहेत. एकाने कमेंट करत लिहिले आहे की, ही एक प्रॅंक व्हिडीओ आहे. तर दुसऱ्या एकाने लिहिले आहे की, सुरक्षा रक्षकाचे हावभाव न समजणारे आहेत. तर आणखीन एकाने व्हिडिओ (Video) पाहून घाबरल्याचे म्हटले आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com