विरोधी पक्षातील २ आमदार तडकाफडकी निलंबित; अचानक नेमकं काय घडलं?

tmc mla suspended : विरोधी पक्षातील २ आमदारांचं तडकाफडकी निलंबित करण्यात आलं आहे. दोन आमदारांना निलंबित केल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
TMC Faces Internal Crisis
Mamata Banerjee saam tv
Published On
Summary

तृणमूल काँग्रेस पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

मुख्यमंत्र्यांनी धक्कादायक खुलासा केल्यानंतर टीएमसीचे २ आमदार निलंबित

२ आमदारांच्या कारवाईनंतर राजकीय वर्तुळात खळबळ

पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. मुख्यमंत्री शुभेंदी अधिकारी यांनी धक्कादायक खुलासा केल्यानंतर टीएमसीच्या ऋतब्रता बॅनर्जी आणि संदीपान साहा या दोन आमदारांना निलंबित करण्यात आलं आहे. तृणमूल काँग्रेस पक्षाने ही कारवाई केली.

TMC Faces Internal Crisis
ठाकरेंच्या शिवसेनेसारखा ममतांचा पक्ष फूटणार? ५० आमदार, २० खासदार बाहेर पडणार, भाजप खासदाराच्या दाव्याने खळबळ

तृणमूल काँग्रेस उपाध्यक्ष चंद्रिमा भट्टाचार्य यांच्या माहितीनुसार, दोन्ही आमदारांनी पक्षाच्या बैठकांना वारंवार गैरहजर राहत होते. तसेच त्यांनी पक्षविरोधी कारवायामध्ये सहभाग दर्शवला. या गंभीर आरोपानंतर दोन्ही आमदारांना निलंबित करण्यात आलं आहे.

मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं की, 'तृणमूल काँग्रेस स्वत:च्या आमदारांना टार्गेट करत आहेत. त्यांनी पक्षाच्या आमदारांच्या सह्यांचा गैरवापर केलाय. ऋतब्रता बॅनर्जी आणि संदीपान साह यांनी स्वत: गैरवापराबाबत तक्रार केली आहे. परंतु या प्रकरणात आमची कोणतीही भूमिका नाही.

TMC Faces Internal Crisis
निवडणुकीत पराभव होताच TMC पक्षात फूट? आमदारांमध्ये पडले दोन गट, राजकीय वर्तुळात खळबळ

पश्चिम बंगालचं सीआयडी पथक या प्रकरणाचा तपास करत आहे. या प्रकरणी तृणमूलच्या अनेक वरिष्ठ नेत्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. खासदार अभिषेक बॅनर्जी यांना आज चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं. संदीपान साहा यांनी या प्रकरणावरून अभिषेक बॅनर्जी यांच्यावर थेट आरोप केले आहेत. पक्षाच्या आमदारांच्या यादीवर पक्षाचे महासचिव बॅनर्जी यांनी सही केली होती. गैरहजर असलेल्या आमदारांच्या सह्या करण्यात आल्या होत्या. या प्रकरणास अभिषेक बॅनर्जी जबाबदार आहेत, असा आरोप निलंबित आमदाराने केला आहे.

तृणमूल काँग्रेस फुटीच्या मार्गावर?

तत्पूर्वी, पश्चिम बंगालमध्ये टीएमसीचे ८० आमदार आहेत. ममता बॅनर्जी यांना कायदेशीररित्या पक्षावर ताबा मिळवण्यासाठी ५४ आमदारांची गरज आहे. परंतु ममता बॅनर्जी यांच्या एका बैठकीला पक्षाचे तब्बल ६० आमदार गैरहजर होते. तर काही आमदार बंडखोरी करणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. यामुळे तृणमूल काँग्रेस पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com